Jayanti Dalal : एकांकिकाकार, प्रकाशक आणि राजकीय नेते – जयंती दलाल

191
Jayanti Dalal : एकांकिकाकार, प्रकाशक आणि राजकीय नेते - जयंती दलाल
Jayanti Dalal : एकांकिकाकार, प्रकाशक आणि राजकीय नेते - जयंती दलाल

जयंती घेलाभाई दलाल हे एक भारतीय लेखक, प्रकाशक, रंगमंचावरील अभिनेते, दिग्दर्शक आणि राजकारणी होते. (Jayanti Dalal) जयंती दलाल यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०९ रोजी अहमदाबाद येथे झाला. त्यांचे वडील घेलाभाई हे देशी नाटक समाज या नाट्यसमूहाचे संयोजक होते. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विविध ठिकाणी झाले. १९२५ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी गुजरात कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. (Jayanti Dalal)

(हेही वाचा – University Guidelines : समूह विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी)

समाजवाद आणि गांधीवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव

१९३० मध्ये जेव्हा ते कला शाखेच्या अंतिम वर्षात होते, तेव्हा त्यांनी भारतीय स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा जन्म नाट्य चळवळीतील कुटुंबात झाला, पुढे त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिले आणि नंतर ते राजकारणात देखील सामील झाले. त्यांच्यावर समाजवाद आणि गांधीवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. त्यांनी एकांकिका, लघुकथा लिहिल्या. (Jayanti Dalal)

त्यांच्या एकांकिकांमध्ये नाविन्यता, भारतीय जीवन, विचार यांचे दर्शन व्हायचे. ते उपहासात्मक संवादासाठी ओळखले जायचे. बालपणीच त्यांचा नाटकांशी संबंध आल्यामुळे ते नाट्यशास्त्रात तरबेज झाले. जीवनदीप, जोइये छे, द्रौपदी नो सहकार, छोटो प्रवेश, प्रवेश त्रिजो ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.

(हेही वाचा – Mumbai High Court : बलात्कार पीडितेच्या बाळाची DNA चाचणी नको; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश)

‘रंगतोरण’ हा त्यांचा बालनाट्यसंग्रह असून अवतरण हा तीन अंकी नाटकांचा संग्रह आहे. त्यांनी लघुकथा आणि कादंबर्‍यासुद्धा लिहिल्या. वॉर ऍंड पीस आणि लिओ टॉलस्टॉयचे त्यांनी गुजराती अनुवादन केले आहे. त्यांना १९५९ मध्ये ‘रणजितराम सुवर्ण चंद्रक पुरस्कार’ मिळाला आहे आणि ‘नर्मद सुवर्ण चंद्रक पुरस्कार’ देखील मिळाला आहे. (Jayanti Dalal)

त्यांनी १९३९ मध्ये प्रकाशनसंस्था सुरू केली. इंदुलाल याज्ञिक यांच्यासोबत ते १९५६ मध्ये महागुजरात चळवळीत सहभागी झाले होते आणि त्या काळात त्यांनी नवगुजरात दैनिक प्रकाशित केले. १९५७ मध्ये ते बॉम्बे स्टेट ऍसेम्ब्लीवर निवडून आले. १९६२ मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली; पण त्यांना पराभव पत्करावा लागला. २४ ऑगस्ट १९७० रोजी अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले. (Jayanti Dalal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.