Batukeshwar Dutt: भारताने उपेक्षिलेले महान क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त

बटुकेश्वर यांनी १९२५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.

293
Batukeshwar Dutt: भारताने उपेक्षिलेले महान क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त
Batukeshwar Dutt: भारताने उपेक्षिलेले महान क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त

बटुकेश्वर दत्त (Batukeshwar Dutt) हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महान क्रांतिकारक होते. बटुकेश्वर दत्त हे नाव ८ एप्रिल १९२९ रोजी गाजले, जेव्हा त्यांना भगतसिंग यांच्यासोबत मध्यवर्ती विधानसभेत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अटक करण्यात आली. त्यांना यासाठी आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० रोजी बंगालच्या औरी गावात झाला. त्यांना बीके दत्त, बट्टू आणि मोहन या नावानेही ओळखले जायचे. बटुकेश्वर यांनी १९२५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांचे आई आणि वडील दोघेही मरण पावले. या दरम्यान ते सरदार भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्या संपर्कात आले आणि ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ या क्रांतिकारी संघटनेचे सदस्य झाले. सुखदेव आणि राजगुरू यांच्यासोबतही त्यांनी विविध ठिकाणी काम केले.

(हेही वाचा – Mumbai High Court : बलात्कार पीडितेच्या बाळाची DNA चाचणी नको; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश)

या दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याची विद्या आत्मसात केली. ८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंग यांच्यासोबत त्यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीमध्ये (सध्याचे संसद भवन) बॉम्बस्फोट करून ब्रिटिश राज्याच्या हुकूमशाहीचा निषेध केला. कुणालाही इजा न करता, केवळ पत्रकाद्वारे आपला मुद्दा प्रसिद्ध करण्यासाठी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. त्या दिवशी भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने सार्वजनिक सुरक्षा विधेयक आणि व्यापार विवाद विधेयक आणले होते, जे यांच्या विरोधामुळे एका मताने मंजूर होऊ शकले नाही.

बटुकेश्वर दत्त यांनी खरेतर एक ठिणगी पेटवली होती. शिक्षा भोगत असताना राजकीय कैद्यांना अपमानास्पद वागणूक मिळत होती म्हणून त्यांनी व भगतसिंह यांनी उपोषण केले, हे उपोषण ऐतिहासिक मानले जाते. स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर त्यांना उपेक्षित जीवन जगावं लागलं. इतकंच काय तर पेन्शनसाठी त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचे प्रमाणपत्र आणायला सांगितले होते, मात्र राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना याबाबत कळलं तेव्हा अपमान करणार्‍या कमिशनरने त्यांची माफी मागितली. २० जुलै जुलै १९६५ रोजी कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला. देशासाठी सर्वोच्च त्याग करूनही त्यांच्या वाटेला उपेक्षाच आली. स्वतंत्र भारतात सशस्त्र क्रांतिकारकांची अशी दशा होणे हे अत्यंत लाजीरवाणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.