मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारनेही मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार, सध्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधून त्यांना जात प्रमाणपत्रं दिलं जात आहे. त्यामुळे कुणबी मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश होत आहे. यावरून ओबीसी नेतेही आक्रमक झाले असून मराठा आणि ओबीसी यांच्यातली दरी वाढत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीपातीच्या राजकारणाने महाराष्ट्र ढवळून निघत आहे. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी २७ जानेवारी २०१८ साली काढलेलं व्यंगचित्र आजच्या परिस्थितीची साक्ष देत आहे.
मनसेच्या अधिकृत Xवरून हे व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे. त्यासोबतच आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर महाराष्ट्रातील मराठी बांधवांना उद्देशून एक चांगला मेसेज देत आहेत. जातीपातीच्या चिखलातून बाहेर या, असं छत्रपती शिवाजी महाराज सांगत असल्याचे या व्यंगचित्रातून व्यक्त होत आहे तसेच मराठा आणि दलित समाज एकमेकांसोबत भांडत आहेत आणि ब्राह्मण बाजूलाच आहेत. चेहरा नसलेले जातीयवादी नेते एकत्र आहेत, असे हे व्यंगचित्र आहे. अरे, मी तुम्हा सर्वांना सोबत घेऊन मुघलांसोबत लढलो आणि तुम्ही एकमेकांविरुद्ध लढताय, का ? तर जातीयवादी नेत्यांच्या स्वार्थासाठी. यारे माझ्या लेकरांनो या चिखलातून बाहेर या…असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणताना दिसत आहेत.
(हेही वाचा – OBC Reservation : ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी केले आश्वस्त )
२७ जानेवारी २०१८ रोजी काढलेलं हे व्यंगचित्र आहे. महाराष्ट्रात आज जातीजातींमध्ये जी भांडणं लावली जात आहेत त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आज महाराष्ट्रातील मराठी बांधवांना उद्दे्शून काय म्हणाले असते, तो विचार मांडण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रांतून केला आहे. व्यंगचित्र पहा आणि विचार करा, असे ट्विट मनसेने केलं आहे.
Join Our WhatsApp Communityराजसाहेबांचं २७ जानेवारी २०१८ चं हे राजकीय व्यंगचित्र… महाराष्ट्रात आज जातीजातींमध्ये जी भांडणं लावली जात आहेत त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आज महाराष्ट्रातील मराठी बांधवांना उद्देशून काय म्हणाले असते तो विचार मांडण्याचा प्रयत्न राजसाहेबांनी ह्या व्यंगचित्रातून केला आहे.… pic.twitter.com/iIcAw6gB5Q
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 17, 2023