Alan Moore : कॉमिक्सच्या जगातला सम्राट – अॅलन मूर

110
Alan Moore : कॉमिक्सच्या जगातला सम्राट - अॅलन मूर
Alan Moore : कॉमिक्सच्या जगातला सम्राट - अॅलन मूर

अॅलन मूर यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९५३ रोजी नॉर्थॅम्प्टन, इंग्लंड येथे झाला. ते एक इंग्रजी लेखक आहेत. वॉचमन, व्ही फॉर वेंडेटा, द बॅलाड ऑफ हॅलो जोन्स, स्वॅम्प थिंग, बॅटमॅन: द किलिंग जोक आणि फ्रॉम हेल अशा कॉमिक बुक्सचे लेखन त्यांनी केले आहे. इंग्रजी भाषेतील सर्वोत्कृष्ट कॉमिक बुक लेखक म्हणून ते ओळखले जातात. (Alan Moore)

विशेष म्हणजे मूर यांनी काही वेला कर्ट विले, जिल डी रे, ब्रिलबर्न लॉग आणि ट्रान्सलुसिया बॅबून अशी टोपणनावे वापरुन लेखन केले आहे. मूर यांनी ब्रिटिश अंडरग्राऊंड आणि फॅझिन्समधून लेखनाला सुरुवात केली. नंतर त्यांना २००० एडी आणि वॉरियर सारख्या मासिकांमध्ये प्रसिद्धी मिळाली.

पुढे त्यांना चक्क डीसी कॉमिक्समधून लिहिण्याची ऑफर आली. बॅटमॅन (बॅटमॅन: दि किलिंग जोक) आणि सुपरमॅन (व्हॉटएव्हर हॅपन्ड टू द मॅन ऑफ टुमॉरो?) यावर काम करण्याची संधी मिळाली. मूर यांच्या लेखणीने कॉमिक्स हा प्रकार खूप गाजवला. जणू कॉमिक्सला त्यांनी सन्मान मिळवून दिला. १९८० च्या दशकांत ते काही काळ कॉमिक्स जगताला राम राम करुन कादंबरी व इतर लिखाण करु लागले. फ्रॉम हेल आणि व्हॉइस ऑफ द फायर ही त्यांची गाजलेली कामे. त्यानंतर १९९० मध्ये ते पुन्हा कॉमिक्सच्या क्षेत्राकडे वळले.

(हेही वाचा : Jayanti Dalal : एकांकिकाकार, प्रकाशक आणि राजकीय नेते – जयंती दलाल)

२०१६ मध्ये त्यांनी जेरुसलेम नावाची १२६६ पृष्ठांची प्रयोगात्मक कादंबरी आणली. मूर यांनी मुलाखतीत असे सांगितले आहे की त्यांना त्यांच्या जन्म गावी जे अनुभव मिळाले त्यातूनच त्यांना कथा सुचल्या आहेत. मूर हे जगभरातल्या अनेक नवोदित कॉमिक्स लेखकांचे आदर्श आहे. आज त्यांचा जन्म दिवस. हिंदुस्थान पोस्टतर्फे महान कॉमिक्स लेखक अॅलन मूर यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.