World Cup 2023 : भारतीय संघाचा विक्रमांचा ‘विक्रम’

भारताने या विश्वचषकातील जवळपास प्रत्येक सामन्यात अनेक विक्रम केले

218
World Cup 2023 : भारतीय संघाचा विक्रमांचा 'विक्रम'

वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना रविवार १९ नोव्हेंबरला (World Cup 2023) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यावेळी भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. भारताने या विश्वचषकातील जवळपास प्रत्येक सामन्यात अनेक विक्रम केले आहेत. यावरून आता रोहित शर्माची ब्ल्यू आर्मी फायनल मॅचसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

नवनवीन विक्रम आणि आकडेवारी खेळाडूंचा (World Cup 2023) चालता – बोलता इतिहास असतो. यावरून खेळाडूंची कामगिरी लक्षात येते. याच पार्श्वभूमीवर आपण या वर्ल्ड कप मधील टीम इंडियाच्या विविध विक्रमांवर एक नजर टाकूया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

सलामीवीर शून्यावर आऊट

या सामन्यात इशान किशन आणि (World Cup 2023) कर्णधार रोहित शर्मा आपले खातेही न उघडता आऊट झाले. वर्ल्ड कपमध्ये एकाच सामन्यात भारताचे दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ. यापूर्वी १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये झिंबाब्वेविरुद्ध सुनील गावस्कर आणि कृष्णमचारी श्रीकांत हे सलामीवीर शून्यावर बाद झाले होते.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान

सर्वाधिक षटकार

या सामन्यात (World Cup 2023) हिटमॅन रोहित शर्माने आपल्या शतकी खेळीदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा ख्रिस गेलचा विक्रम मोडला. गेलने कसोटी, वनडे आणि टी – २० या तिन्ही प्रकारांत मिळून ५५१ डावांमध्ये ५५३ षटकार मारले होते, तर रोहितने ४७३ डावांमध्ये ५५६ षटकार मारले आहेत.

तसेच रोहितने या सामन्यादरम्यान एकदिवसीय विश्वचषक कारकिर्दीतील सातवे शतक केले. असं करत त्याने सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक म्हणजेच ६ विश्वचषक शतकांचा विक्रम मोडला.

(हेही वाचा – India in Final : उपांत्य फेरीतील विजयानंतर भारतीय ड्रेसिंगरुममध्ये असा झाला जल्लोष)

भारत विरुद्ध पाकिस्तान

वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) भारताने सलग आठवेळा पाकिस्तानला धूळ चारली. सात गडी आणि ११७ चेंडू राखून भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला.

याच सामन्यादरम्यान अजून एक नवीन विक्रम रचला गेला. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना एकाचवेळी तब्बल ३.५ कोटी दर्शकांनी डिस्नी + हॉटस्टार वर पाहिल्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारताचा विजयोत्सव कायम …

या सामन्यादरम्यान मोहम्मद शमी हा विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेत दोन वेळा पाच विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच; या मॅचमध्ये भारतीय संघाचा प्रिन्स अशी ओळख असणाऱ्या शुभमन गिल याने वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद म्हणजेच केवळ ३८ डावांमध्ये दोन हजार धावांचा टप्पा पार करत आपल्या नावावर एक नवीन विक्रम नोंदवून घेतला.

(हेही वाचा – India in Final : इंडिगो विमानाच्या वैमानिकाने जेव्हा विमानातच दिले उपान्त्य सामन्यांचे अपडेट, व्हीडिओ व्हायरल )

भारत विरुद्ध इंग्लंड

भारताचे वर्चस्व !

रोहितच्या १८ हजार धावा पूर्ण. या सामन्यात (World Cup 2023) रोहितने ८७ धावांची खेळी करत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजार धावांचा टप्पा ओलांडला. ही कामगिरी करणारा तो सचिन, द्रविड, गांगुली आणि विराट नंतर चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.

रोहितने वनडेमध्ये १०,५१० कसोटीमध्ये ३,६७७ आणि टी – २० मध्ये ३,८५३ धावा केल्या आहेत.

भारत विरुद्ध श्रीलंका

विजयसप्तकासह भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल

मोहम्मद शमी हा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील (World Cup 2023) सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने केवळ १४ डावांमध्ये ४५ गडी बाद केले. त्याने झहीर खान (२३ डावांत ४४ बळी) आणि श्रीनाथ (३३ डावांत ४४ बळी) यांचा विक्रम मोडीत काढला.

(हेही वाचा – Ind vs Aus Final : अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादेत वायूदलाचा एअर शो)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

शतकविक्रमाची बरोबरी !

विराट कोहलीचे विक्रमी शतक हे या सामन्याचे प्रमुख आकर्षण (World Cup 2023) होते. या सामन्यात आपलं ४९ वं शतक करून विराटने सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. आपल्या ३५ व्या वाढदिवशी विराटने आपल्या चाहत्यांना ही भेट दिली.

भारत विरुद्ध नेदरलँड

या सामान्यात भारतीय फलंदाजांनीही आपले गोलंदाजीचे कौशल्य अजमावत विकेट घेतल्या. तसेच या सामन्यात रोहितने वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) सर्वाधिक म्हणजेच २४ षटकार मारण्याचा विक्रम रचला.

तसेच भारताच्या फळीतील पहिल्या पाच फलंदाजांनी प्रथमच एकाच डावात ५० हून अधिक धावा करत एक नवीन विक्रम रचला. तर श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी विश्वचषकातील (World Cup 2023) सर्वोत्तम भागीदारी केली. या दोघांना मायकल क्लार्क आणि ब्रॅड हॉज यांचा २०४ धावांचा विक्रम मोडून काढला.

(हेही वाचा – India vs Aus Final : भारत सलग ९ सामन्यांमध्ये विजयी पण, कर्णधार रोहित शर्माला ‘या’ गोष्टींची चिंता )

भारत विरुद्ध न्यूझीलंड ( सेमी फायनल)

सलग नऊ सामने जिंकत भारताने अतिशय दिमाखात विश्वचषकाच्या (World Cup 2023) उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. ही सेमी फायनल भारतीय संघ आणि चाहत्यांसाठी विशेष ठरली ती म्हणजे विराट कोहलीच्या ५० व्या शतकामुळे.

त्याचसोबत विराटने या सामन्यामधून एका विश्वचषकात सर्वाधिक (World Cup 2023) धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडीत काढला. कोहलीने आतापर्यंत १० सामन्यांमध्ये ७११ धावा केल्या आहेत. तर सचिनने २००३ च्या वर्ल्ड कपमध्ये ६७३ धावा केल्या होत्या.

तसेच मोहम्मद शमी हा या विश्वचषकातील सर्वाधिक म्हणजेच २३ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. (World Cup 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.