चॅटजीपीटी’ (ChatGPT)हे एआय (Open AI) टूल आल्यापासून आर्टिफिशिअल इंटिलिजेन्सबाबत सगळीकडेच चर्चा सुरू झाली होती. हे टूल बनवणाऱ्या कंपनीचे सीईओ आणि को-फाऊंडर सॅम अल्टमन यांनाही जगभरात ओळख मिळाली होती. अवघ्या जगाला ध़डकी भरविणाऱ्या या कंपनीने सीईओ आणि सह संस्थापक सॅम ऑल्टमनला नोकरीवरून काढून टाकले आहे.यानंतर दुसरे संस्थापक ग्रेग ब्रोकमन यांनीही कंपनीतून राजीनामा दिला आहे. मात्र आता भारतीय वंशाच्या मीरा मुरत्ती (Meera Murati) या अंतरिम सीईओ असणार आहेत. (Open AI CEO Meera Murati)
गेल्यावर्षी चॅट जीपीटी लाँच झाले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. करो़डो नोकऱ्या जाण्याची भीती निर्माण झाली होती. ओपनएआयला मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपनीचा आसरा मिळाला आहे. कंपनी बोर्डाला त्यांच्या नेतृत्व कौशल्यावर आता विश्वास राहिला नसल्याचं कंपनीने म्हटलं होतं त्यामुळे सॅम अल्टमन यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. (Open AI CEO Meera Murati)
कंपनीची प्रतिक्रिया
“सॅम अल्टमन यांचे सध्या परीक्षण सुरू आहे. ते बोर्डाशी होत असलेल्या संभाषणात ते सातत्याने प्रामाणिक नव्हते. त्यामुळे आपली जबाबदारी पार पाडण्याच्या त्यांच्या क्षमतेस अडथळा निर्माण होत होता. ओपन एआय कंपनीचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या क्षमतेत आता बोर्डाला विश्वास नाही.” असं कंपनीच्या बोर्डाने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.ओपन एआय कंपनीच्या स्थापनेसाठी आणि वृद्धीसाठी सॅम यांचे भरपूर योगदान राहिले आहे. त्याबद्दल कंपनी बोर्ड कृतज्ञ आहे. मात्र, पुढचा विचार करता नवीन नेतृत्वाची गरज असल्याचंही आम्हाला वाटत आहे”, असंही बोर्डाने स्पष्ट केलं.
काय म्हणाले सॅम
यानंतर सॅम यांनी एक्स पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ओपन एआयमध्ये काम करायला मला आवडलं. यामुळे माझ्यात आणि कदाचित संपूर्ण जगामध्ये देखील काही बदल झाला. याठिकाणी प्रतिभावान लोकांसोबत काम करणं मला सर्वात जास्त आवडलं.” अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. आता पुढच्या वाटचालीबाबत अधिक सांगायचं आहे, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
i loved my time at openai. it was transformative for me personally, and hopefully the world a little bit. most of all i loved working with such talented people.
will have more to say about what’s next later.
🫡
— Sam Altman (@sama) November 17, 2023
ग्रेग ब्रोकमन यांचा राजीनामा
सॅम अल्टमन यांच्या हकालपट्टीच्या बातमीनंतर ओपन एआयचे दुसरे संस्थापक ग्रेग ब्रोकमन यांनीही कंपनीतून राजीनामा दिला आहे. “आठ वर्षांपूर्वी माझ्या अपार्टमेंटमध्ये आपण ही कंपनी सुरू केली होती. त्यानंतर आपण जे काही उभारलं आहे, त्याबद्दल मला खरंच अभिमान आहे. आपण सोबत राहून बरंच काही पाहिलं आणि मिळवलं आहे. आपण काही अशक्य गोष्टी शक्य केल्या. मात्र, आजची बातमी पाहिल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे.” अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
After learning today’s news, this is the message I sent to the OpenAI team: https://t.co/NMnG16yFmm pic.twitter.com/8x39P0ejOM
— Greg Brockman (@gdb) November 18, 2023
मिरा मुराती अंतरिम सीईओ
सॅम यांची हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांच्या जागी मिरा मुराती (Mira Murati) या अंतरिम सीईओ म्हणून कामकाज पाहतील. मिरा यांनी 2018 साली ओपन एआय कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. सध्या त्या कंपनीच्या चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून काम पाहत होत्या. (Open AI CEO Meera Murati)
(हेही वाचा : Jammu Kashmir : भारतीय लष्कराकडून लष्कर-ए-तोएबाच्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा)
Join Our WhatsApp Community