Uttarkashi Tunnel Accident : पाच दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी नातेवाईकांनी साधला संवाद

139
Uttarkashi Tunnel Accident : पाच दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी नातेवाईकांनी साधला संवाद
Uttarkashi Tunnel Accident : पाच दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी नातेवाईकांनी साधला संवाद

उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील पाच दिवसांपूर्वी बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सोडवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले जात आहे. सध्या ४० मजूर अडकलेले आहे. येथील २४ मीटर पट्टय़ातील ढिगारा हटवण्यात कर्मचाऱ्यांना यश आले आहे. अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे (एनएचआयडीसीएल) देण्यात आली. त्यासाठी विविध संस्थांचे १६५ कर्मचारी कार्यरत आहेत.अडकलेल्या मजुरांच्या नातेवाईकांना पाइपमधून त्यांच्याशी बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे . त्यामुळे त्यांच्या मध्येही समाधानाचे वातावरण आहे. (Uttarkashi Tunnel Accident)

शक्तिशाली यंत्रांच्या मदतीने २४ मीटपर्यंत ढिगारा हटवण्यात आला आहे. मजुरांना बाहेर काढण्यासाठी एकूण ६० मीटपर्यंत ढिगारा हटवणे आवश्यक आहे. त्यासाठी ८०० आणि ९०० मिलीमीटर व्यासाचे पाइप एकापाठोपाठ एक टाकले जात आहेत. एका तासाला चार ते पाच मीटर खोदकाम होण्याची अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्ष काम करणाऱ्या पथकाला थोडा वेळ लागत आहे. त्याबरोबरच ड्रिलिंगचे यंत्र डिझेलवर चालवले जात आहे त्यामुळेही प्रगतीचा वेग मंद आहे. काम करताना कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असल्याचेही खलखो म्हणाले. सध्या वापरले जात असलेले यंत्र हवाई दलाच्या विमानांनी दिल्लीहून आणले आहे. त्याच्या जोडीला इंदूरहून आणखी एक ‘ऑगर’ यंत्र मागवण्यात आले आहे. जेणेकरून बचावकार्यात कोणताही खंड पडणार नाही. (Uttarkashi Tunnel Accident)

(हेही वाचा : Open AI CEO Meera Murati : ChatGPT’ बनवणाऱ्या Open AI कंपनीची धुरा भारतीय वंशाच्या मीरा मुरत्ती यांच्या हाती)

नातेवाईकांनी साधला संपर्क
अडकलेल्या मजुरांच्या नातेवाईकांना पाइपमधून त्यांच्याशी बोलण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशातून आलेल्या दोघांनी त्यांच्या नातेवाईक मजुरांशी संवाद साधला. माझा पुतण्या आत अडकला आहे, मी त्याच्याशी बोललो. एका मजुराच्या वडिलांनीही आपल्या मुलाचा आवाज ऐकता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.