तुम्ही देखील यूपीआय (UPI) पेमेंट NPCI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI युजर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वर्षभरात एकापेक्षा जास्त वेळ कोणताही व्यवहार न झालेली खाती बंद करण्यात येणार आहेत.NPCI ने निष्क्रिय UPI क्रमांक आणि आयडी बंद करण्यासाठी बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सना 31 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे, जर युजर्सला त्याचा UPI आयडी आणि नंबर नेटवर्क बंद करायचं नसेल, तर त्याला त्याचा UPI सक्रिय ठेवावा लागेल. (UPI Alert)
यूपीआय (UPI) नेटवर्क चालवणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) वतीने, गुगत पे (Google Pay), पेटीएम (Paytm) आणि फोन पे (PhonePe) सारख्या थर्ड पार्टी यूपीआय (UPI) अॅप्सना काही यूपीआय आयडी (UPI ID) आणि नंबर ब्लॉक करण्यास सांगितलं आहे. UPI आयडी आणि नंबर नेटवर्क काढताना किंवा बंद करताना, बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सना ईमेल आणि मेसेजद्वारे युजर्सना माहिती द्यावी लागेल. (UPI Alert )
(हेही वाचा :Open AI CEO Meera Murati : ChatGPT’ बनवणाऱ्या Open AI कंपनीची धुरा भारतीय वंशाच्या मीरा मुरत्ती यांच्या हाती)
एनपीसीआयने सांगितलं आहे की, ‘डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये ग्राहकांसाठी सुरक्षित व्यवहाराचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी बँकिंग प्रणाली नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. काही युजर्स नव्याने अकाऊंट लिंक करुन मोबाइल नंबरला बदलतो पण त्या नंबरवरून यूपीआई खाते बंद करत नाही.’ दरम्यान, वापरात असलेला यूपीआय क्रमांक आणि यूपीआय आयडी (UPI ID) सक्रिय राहतील. (UPI Alert)
११ अब्ज UPI व्यवहार
एनपीसीआयने जारी केलेल्या अधिसूचनेत यूपीआयच्या माध्यमातून 11 अब्जहून अधिक व्यवहार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत यूपीआय व्यवहार जवळपास एक अब्जने वाढले आहेत. NPCI दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक त्यांचे मोबाईल नंबर बदलतात. त्यावेळी, सिस्टममधून जुना क्रमांक काढला जात नाही. ट्रायच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन युजरला जुना क्रमांक जारी केला जाऊ शकतो. यामुळे, सर्व बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सना कोणत्याही प्रकारचे व्यवहार केले जात नाहीत, असे सर्व निष्क्रिय UPI आयडी आणि नंबर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (UPI Alert )