World Cup 2023 Final : वर्ल्डकप विजेत्या माजी कर्णधारांना आमंत्रण मात्र ‘या’ देशाचे कर्णधार राहणार अनुपस्थित

149
World Cup 2023 Final : वर्ल्डकप विजेत्या माजी कर्णधारांना आमंत्रण मात्र 'या' देशाचे कर्णधार राहणार अनुपस्थित

१० पैकी १० साखळी सामने जिंकून भारताने विश्वचषकाच्या (World Cup 2023 Final) अंतिम फेरीत मजल मारली आहे. आता २०११ प्रमाणेच घरच्या मैदानात विश्वविजेती कामगिरी करण्यासाठी संघ सज्ज झाला आहे.

विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांबरोबरच (World Cup 2023 Final) अहमदाबादचं क्रिकेट मैदान, मैदानावर येणारे सव्वा लाख प्रेक्षक आणि मैदानावर नाही पण, घरी बसून या सामन्याचा आनंद लुटणारे १.३ अब्ज भारतीय नागरिक असे सगळे या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत.

(हेही वाचा – World Cup 2023 : भारतीय संघाचा विक्रमांचा ‘विक्रम’)

अशातच आता हा अंतिम सामना बघण्यासाठी आयसीसीने (World Cup 2023 Final) विश्वचषक विजेत्या सर्व माजी कर्णधारांना आमंत्रण दिले आहे. मात्र पाकिस्तान आणि श्रीलंका संघाचे कर्णधार यावेळी अनुपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मागील विश्वचषक विजेत्या कर्णधारांसाठी आयसीसी विशेष ब्लेझरची व्यवस्था करणार आहे.

‘या’ कारणामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका संघाचे कर्णधार राहणार अनुपस्थित

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने विश्वचषक २०२३च्या (World Cup 2023 Final) अंतिम सामन्यासाठी १९७५ ते २०१९ पर्यंतच्या सर्व विश्वचषक चॅम्पियन कर्णधारांना आमंत्रित केले आहे. मात्र, पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान तुरूंगात असल्याने या कार्यक्रमाला मुकणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात १९९२ मध्ये पाकिस्तानने विश्वचषक जिंकला होता.

(हेही वाचा – Ind vs Aus Final : जाणून घ्या फायनलसाठी कशी असणार खेळपट्टी)

याशिवाय श्रीलंकेला चॅम्पियन (World Cup 2023 Final) बनवणारे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा हे देखील अनुपस्थित राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण अलीकडेच त्यांनी बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यावर गंभीर आरोप करताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाची अवस्था खराब होण्यामागे शहांचा हात असल्याचे म्हटले होते.

(हेही वाचा – World cup 2023 : विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आर अश्विनला संधी मिळणार?)

‘या’ कर्णधारांनी जिंकला वर्ल्ड कप

विश्वविजेत्या कर्णधारांमध्ये (World Cup 2023 Final) अनेक दिग्गजांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजचे क्लाइव्ह लॉयड, भारताचे कपिल देव, ऑस्ट्रेलियाचे अॅलन बॉर्डर, पाकिस्तानचे इम्रान खान , श्रीलंकेचे अर्जुन रणतुंगा, ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग, भारताचा महेंद्रसिंग धोनी , ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क आणि इंग्लंडचा इऑन मॉर्गन यांचा या यादीत समावेश आहे.

मात्र, इम्रान खान तुरूंगात असल्यामुळे फायनलच्या लढतीचे साक्षीदार होणार नाहीत तर अर्जुन रणतुंगा हे देखील न येण्याची दाट शक्यता आहे. ‘भारताचा एक माणूस श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाला सुरूंग लावत आहे’, अशा शब्दांत रणतुंगा यांनी शहांवर टीकेचे बाण सोडले. तसेच जय शहा हे केवळ त्यांच्या वडिलांमुळेच शक्तीशाली आहेत. कारण त्यांचे वडील अमित शहा भारताचे गृहमंत्री आहेत, असेही रणतुंगा यांनी म्हंटले होते. (World Cup 2023 Final)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.