Pune: एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सरडेवाडी येथे धनगर समाजातर्फे रास्ता रोको

इंदापूर तालुक्यात या आरक्षणाचे पडसाद उमटत आहेत.

107
Pune: एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सरडेवाडी येथे धनगर समाजातर्फे रास्ता रोको
Pune: एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सरडेवाडी येथे धनगर समाजातर्फे रास्ता रोको

पुण्यातील सरडेवाडी (ता. इंदापूर) टोल नाका येथे सकल धनगर समाजाच्या (Pune) वतीने शनिवारी, १८ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्याच्या दुतर्फा लागल्या होत्या. यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली.

धनगर समाजासाठी असलेल्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी तसेच बारामातीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा मिळण्याकरिता हे आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीबाबत सरकारने ५० दिवसांची मुदत घेतली होती. ती मुदत आता संपली आहे. सरकार आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे, अशी तक्रार करून एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. गेल्या १० वर्षांपासून बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर चंद्रकांत वाघमोडे यांनी धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. इंदापूर तालुक्यात या आरक्षणाचे पडसाद उमटत आहेत. राज्य सरकारने या आरक्षणाची दखल न घेतल्याने उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाज बांधवांकडून देण्यात आला आहे.

(हेही वाचा – World Cup 2023 Final : अहमदाबादमध्ये हॉटेलसह विमानाचे भाडे गगनाला भिडले )

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत पाडुळे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी निवेदन स्वीकारत आंदोलकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.