देशभरात छठपूजेला सुरुवात झाली आहे. दिल्लीतही छठपूजा (Delhi ChhathPuja) सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे दिल्ली वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीबाबत सूचना जारी केल्या आहेत.
दिल्ली वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे की, १९ नोव्हेंबर रोजी दुपारी/संध्याकाळी गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी, वाहतूक पोलिसांकडून गरजेनुसार प्रमुख तलावांना लागून असलेल्या रस्त्यांवरून प्रवास करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. छठ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीतील मुख्य तलाव आणि घाटांना लागून असलेल्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांनी अशा ठिकाणांवरून जाणे टाळण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
(हेही वाचा – Pune: एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सरडेवाडी येथे धनगर समाजातर्फे रास्ता रोको)
आउटर रिंग रोड, जुना वझीराबाद पूल ते आयटीओ, विकास मार्ग, पुष्टा रोड (खजुरी/शास्त्री पार्क) कालिंदी कुंज पूल, जीटीके रोड, रोहतक रोड, पंखा नजफगड रोड, एमबी रोड, माँ आनंदमाई मार्ग इत्यादी रस्त्यांवरून वाहतूक टाळण्याचा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानक, जुनी दिल्ली रेल्वे स्थानक, निजामुद्दीन रेल्वे स्थानक आणि आयएसबीटीसाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत तसेच रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी दिल्ली मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेण्याचे आवाहन जनतेला केले जाते. प्रवाशांनी नियुक्त केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच आपले वाहन पार्क करावे तसेच वाहने रस्त्याच्या कडेला पार्किंग करणे टाळा कारण त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. कोणतीही अज्ञात वस्तू किंवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास, कर्तव्यावर असलेल्या जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली जाईल. सामान्य जनता आणि वाहनचालकांना संयम बाळगण्याचा, वाहतुकीचे नियम आणि शिस्त पाळण्याचा आणि सर्व चौकांत तैनात असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गैरसोय टाळण्यासाठी लोकांनी त्यांच्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करावे, असे आवाहन दिल्ली वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.