South Central Mumbai : शेवाळेंशी टक्कर देण्यासाठी उबाठा शिवसेनेला शोधावा लागणार नवा चेहरा

सन २०१९च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती झाली नसती तर शिवसेने विजयाची खात्री असलेला एकमेव मतदार संघ होता तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ.

163
South Central Mumbai : शेवाळेंशी टक्कर देण्यासाठी उबाठा शिवसेनेला शोधावा लागणार नवा चेहरा
South Central Mumbai : शेवाळेंशी टक्कर देण्यासाठी उबाठा शिवसेनेला शोधावा लागणार नवा चेहरा
  • सचिन धानजी,मुंबई

सन २०१९च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती झाली नसती तर शिवसेने विजयाची खात्री असलेला एकमेव मतदार संघ होता तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ. या मतदार संघाचे खासदार राहुल शेवाळे हे शिवसेनेत असल्याने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी एकमेव मतदार संघ सुरक्षित मानला जात आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युतीत हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार असला तरी उबाठा शिवसेनेच्यावतीने आदित्य शिरोडकर, विशाखा राऊत यांच्या नावाची चर्चा असली तरी काँग्रेसकडेही वर्षा गायकवाड आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यासारखे उमेदवार असल्याने उबाठा शिवसेना ही काँग्रेससाठी सोडण्याशिवाय पर्याय उरणार नाही. (South Central Mumbai)

दक्षिण मध्य मुंबई (South Central Mumbai) हा सन २००९ पर्यंत उत्तर मुंबई मतदार संघ म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे या मतदार संघात आजवर काँग्रेसचे शरद दिघे हे दोन वेळा, तर रिपाइंचे रामदार आठवले हे एकवेळा आणि शिवसेनेकडून विद्याधर गोखले, नारायण आठवले, मनोहर जोशी हे निवडून आले होते. त्यानंतर सन २००४मध्ये झालेल्या लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांनी प्रिं. मनोहर जोशी यांचा पराभव केला. त्यानंतर सन २००९मध्ये हा मतदार संघ दक्षिण मध्य मुंबई म्हणून ओळखला गेला आणि त्यामध्ये शिवसेनेने माजी आमदार सुरेश गंभीर यांना उमेदवारी दिली होती. परंतु गंभीर यांचा पराभव करून गायकवाड यांनी पुन्हा विजय मिळवला. परंतु सन २०१४नंतर आजमितीस सलग दोन वेळा राहुल शेवाळे हे खासदार म्हणून निवडून आले. (South Central Mumbai)

(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संसदेचे विशेष सत्र बोलवा; उबाठाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले)

या मतदार संघात शिवसेनेला प्रथमच मजबूत उमेदवार लाभला होता, परंतु हे खासदार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य नेता असलेल्या शिवसेनेत गेल्याने उबाठा शिवसेनेला (UBT Shiv Sena) आता नवीन उमदेवार शोधण्याची वेळ आली आहे. शिवसेनेकडून पुन्हा शेवाळे यांना उमेदवारी निश्चित असून शिवसेना आणि भाजपची युती असल्याने शेवाळेंनी पुन्हा एकदा मतदार संघाची बांधणी करायलाही सुरुवात केली. शिवसेनेकडे शेवाळेंच्या रुपात एक उमेदवार असून उबाठा शिवसेनेकडे (UBT Shiv Sena) मात्र तगडा उमेदवार नाहीत. त्यामुळे यापूर्वीचा इतिहास लक्षात घेता एका नामवंत चेहऱ्याला संधी दिली जाईल किंवा यापूर्वी मनसेकडून निवडणूक लढणाऱ्या आदित्य शिरोडकर किंवा अन्य व्यक्तीला रिंगणात उतरवले जाईल असे बोलले जात आहे. तर मनसेही या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करणार असल्याने ते बाळा नांदगावकर यांना संधी देण्याची शक्यता आहे. नांदगावकर यांनी त्यादृष्टीकोनातून मतदार संघात बॅनर लावून ओळखपट्टी करण्यास सुरुवात केली आहे. (South Central Mumbai)

माहिम आणि चेंबूरमध्ये शिवसेना, धारावीमध्ये काँग्रेस, अणुशक्ती नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शीव कोळीवाडा आणि वडाळा विधानसभेत भाजपचे आमदार आहेत. त्यापैकी अणुशक्ती नगर व धारावीमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वादात अनुक्रमे नवाब मलिक आणि वर्षा गायकवाड या निवडून आल्या होत्या. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईत भाजपचे दोन आमदार असले तरी सर्व मतदार संघात भाजपचे प्राबल्य मोठ्याप्रमाणात असल्याने शिवसेनेतील अंतर्गत मतांची विभागणी झाली तरी भाजपच्या मतांच्या जोरावर शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (South Central Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.