Rape : कबरीतून ५ वर्षीय मुलीचा मृतदेह बाहेर काढून केले अत्याचार; वासनांध मोहम्मद रफिकला अटक

109

मानवतेला लाजवेल अशी धक्कादायक घटना वाराणसीमध्ये उघडकीस आली. रेवाडी तालाब कब्रस्तानमधून एका मुस्लिम तरुणाला अटक केली आहे. मोहम्मद रफिक असे या तरुणाचे नाव आहे. रफिक हा एक दिवस आधी स्मशानात पुरलेल्या ५ वर्षीय मुलीचे शव बाहेर काढून त्यावर बलात्कार (Rape) करत होता. सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. मुली मेल्यानंतरही सुरक्षित नाहीत का, असा सवाल विचारला जात आहे.

मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळ जाऊन मोहम्मद रफिकला अटक केली. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनीही आपल्या मुलीच्या मृतदेहावर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप केला आहे. पोलीस तपासानंतर कारवाई करणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात एसीपी दशाश्वमेध डॉ. अवधेश पांडे यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. एसीपीने सांगितले की, मोहम्मद रफी हा अंमली पदार्थांचा व्यसनी होता आणि रात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्याने माती काढून मृतदेह बाहेर काढला, तो आपल्याजवळ ठेवला आणि त्याच्याजवळ झोपला. दुसऱ्या दिवशी ही बाब वडिलांना समजली आणि त्याला अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा Halal Certificateच्या विरोधात योगी सरकार संतप्त; कंपन्यांवर करणार कारवाई)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दशाश्वमेध परिसरातील सदानंद बाजार येथे राहणाऱ्या व्यक्तीच्या 5 वर्षांच्या मुलीचा बुधवारी, 16 नोव्हेंबर 2023 रोजी उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास रेवाडी तलावातील स्मशानभूमीत मुलीचा मृतदेह पुरण्यात आला. त्यानंतर लोक घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी मुलीचे वडील कबरीवर पाणी टाकण्यासाठी आणि फुले वाहण्यासाठी गेले असता त्यांना कबरीवरची माती काढलेली दिसली.

जेव्हा त्यांनी कबर खोदली तेव्हा त्यांच्या मुलीचा मृतदेह गायब होता. त्यांनी चौकशी सुरू केली असता, रेवाडी तलावात राहणारा मोहम्मद रफिक उर्फ छोटू हा कब्रस्तानच्या एका कोपऱ्यात त्या मृत मुलीच्या मृतदेहासह झोपलेला आढळून आला. यावर त्यांनी आपल्या मुलीच्या मृतदेहासोबत काहीतरी अनुचित प्रकार (Rape) घडल्याचे पोलिसांना सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.