BMC Hospital Recruitment : महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांसह इतर रुग्णालयांमध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी लवकरच होणार भरती

या पदांची भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी टि. सी. एस. आयओएन अर्थात टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

527
BMC Hospital मध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी कुठे? मागील ९ महिन्यांपासून अंमलबजावणी नाही

मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर या तीन प्रमुख रुग्णालयांसह नायर दंत रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय तसेच प्रसुतीगृहांमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण सहाय्यक आणि क्ष-किरण तंत्रज्ञ आदींची २७४ पदे रिक्त असून ही सर्व पदे लवकरच भरली जाणार आहेत. या पदांची भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी टि. सी. एस. आयओएन अर्थात टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (BMC Hospital Recruitment)

महापालिकेची तीन प्रमुख रुग्णालये, नायर दंत रुग्णालये, कस्तुरबा रुग्णालय व प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा सहायक, क्ष-किरण सहायक आणि क्ष-किरण सहायक आदींची २७४ पदे रिक्त आहेत. सन २०१५मध्ये या पदांसाठी शेवटची भरती झाली होती. परंतु त्यानंतर या पदांची भरती न झाल्याने मागील सात वर्षांच्या कालावधीत अनेक पदे रिक्त झाली आहे. त्यामुळे या तिन्ही संवर्गाकरता निवड प्रक्रिया राबवली जाणार असून या ऑनलाईन भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. टि. सी. एस. आयओएन अर्थात टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस लिमिटेड या संस्थेची निवड करण्यात आली आहे. याबाबत लवकरच जाहिरात प्रदर्शित करून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या तिन्ही पदांसाठी सुमारे ३० हजार अर्ज येणे अपेक्षित मानले जात आत असून या भरतीमध्ये सहभाग होणाऱ्या इच्छुक उमेदवारामागे ७९७ रुपये शुल्क संस्थेला दिले जाणार आहे. (BMC Hospital Recruitment)

(हेही वाचा – South Central Mumbai : शेवाळेंशी टक्कर देण्यासाठी उबाठा शिवसेनेला शोधावा लागणार नवा चेहरा)

भरती प्रक्रिया राबवण्यासाठी 

प्रयोगशाळा सहाय्यक एकूण पदे : १३९

क्ष-किरण सहाय्यक एकूण पदे : ८४

क्ष-किरण तंत्रज्ञ एकूण पदे : ५४ (BMC Hospital Recruitment)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.