भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी खेळला जाणार असून या क्रिकेट सामन्याकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे या अंतिम सामना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींकडे विविध प्रकारचे आयोजन केले जात असून मनसेनेही खेळायचं ते जिंकण्यासाठीच असं म्हणत शिवाजी पार्कमधील क्रिकेट रसिकांसाठी बालमोहन शाळेजवळील चौकात मोठ्या स्क्रिनची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या चौकांत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी चुकवू नका असं आवाहन मनसेने केले आहे. (Ind vs Aus Final)
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया संघातील वर्ल्डकप क्रिकेटमधील अंतिम सामन्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली असून हा सामना सर्वांना पाहता यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या ‘शिवतीर्था’जवळ केळुस्कर मार्ग आणि एम. बी. राऊत मार्ग यांच्या जंक्शनवर (शारदा पान-जिप्सी हॉटेल चौकात) एका विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘दीपोत्सवा’च्या लखलखाटाच्या पार्श्वभूमीवर ‘भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया’ सामना लाईव्ह अनुभवण्याची संधी एकप्रकारे मनसेने उपलब्ध करून दिली आहे. (Ind vs Aus Final)
(हेही वाचा – BMC Hospital Recruitment : महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांसह इतर रुग्णालयांमध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी लवकरच होणार भरती)
सचिन तेंडुलकरला आपण ‘क्रिकेटचा देव’ म्हणतो कारण भारतीयांसाठी क्रिकेट म्हणजे धर्मच! एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळायला भारतीय संघ रविवारी ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात मैदानात उतरेल तेव्हा कोट्यवधी भारतीय आपसूक ‘भारतमातेचा जयजयकार’ करतील. रस्ते निर्मनुष्य होतील. सामना जसा पुढे रंगत जाईल तसतशा कोटी कोटी क्रिकेटप्रेमींच्या टाळ्या- घोषणा- चित्कार यांतून भावनिक ओहोटी-भरतीचं अदभूत दर्शन घडेल. त्यामुळेच याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता यावा म्हणून मनसेकडून मोठी स्क्रिन बसवण्यात येत आहे. (Ind vs Aus Final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community