१८५७ च्या स्वातंत्र्य समरामध्ये राणी लक्ष्मीबाई (Queen of Jhansi) यांचे मोठे योगदान होते. हा उठाव खूपच मोठा आणि व्यापक होता. या उठावामुळे इंग्रज खूपच सावध झाले. झाशीची राणी ही अतिशय शूर महिला होती. तिचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ मध्ये झाला. तिला लहानपणी मणिकर्णिका व लाडाने मनू म्हटले जायचे. आईचे नाव भागिरथी आणि वडिलांचे नाव मोरोपंत तांबे. मोरोपंत पुण्याला पेशव्यांच्या आश्रयाला आले. मनू चार वर्षांची असताना आईचा मृत्यू झाला.
मनू ही चतुर, धोरणी व शूर मुलगी होती. १४ व्या वर्षी मनूचा विवाह झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा मनूची लक्ष्मीबाई झाली. लक्ष्मीबाई ही सामान्य स्त्री नव्हती, तिला तलवारबाजी, व्यायाम, घोडेस्वारी यात खूप रस होता. गंगाधर आणि लक्ष्मीबाईला एक मुलगा झाला. चार महिन्यांतच तो वारला. १८५३ मध्ये ते आजारी पडले. त्यांनी आपले भाऊ वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेतले. या मुलाचे नाव दामोदर. २१ नोव्हेंबर १८५३ मध्ये गंगाधर रावांचे निधन झाले.
(हेही वाचा – Anjali Damania : भुजबळांनी जागा हडपून बंगला बांधला; अंजली दमानियांचा गंभीर आरोप )
वयाच्या १८ व्या वर्षी लक्ष्मीबाईला झाशीचा कारभार स्वीकारावा लागला. त्या काळच्या नियमानुसार त्यांना स्वतःचा पुत्र नसल्याने इंग्रजांनी झाशी संस्थान खालसा करण्यास सांगितले. ’मी माझी झाशी देणार नाही.” हे राणीचे उद्गार खूप गाजले. झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईला शहरातील राजवाड्यात जाऊन राहावे लागले. मात्र राणीच्या मनात इंग्रजांना धडा शिकवण्याचा विचार होता. १८५७ च्या लढ्यात लक्ष्मीबाईने पुन्हा झाशीची सूत्रे आपल्या हाती घेतली.
मात्र त्यानंतर राणीला खूप संघर्ष करावा लागला. इंग्रजांनी झाशीवर आक्रमण केले. तात्या टोपे यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध दोन आठवडे चालले. सैनिक किल्ल्यात शिरले आणि लूट सुरू केली. राणी आपल्या मुलाला घेऊन बाहेर पडली. झाशी सोडल्यानंतर ती काल्पी येथे आली. तिथल्या पेशव्यांनी तिला मदत केली, सैन्यबल पुरवले.
२२ मे १८५८ रोजी इंग्रजांनी काल्पीवर आक्रमण केले. सुरुवातीला राणीने इंग्रजांना पळवून लावले. तर इंग्रजांनी पुन्हा आक्रमण केले तेव्हा राणीचा पराभव झाला. पुढे १८ जून १८५८ रोजी इंग्रजांनी ग्वालियरवर हल्ला केला. लक्ष्मीबाई रणांगणात उतरली. प्रचंड पराक्रम गाजवला मात्र राणी रक्तबंबाळ झाली. घायाळ राणीला सेवकाने एका मठात आणले. तिथे तिने आपला प्राण सोडला. इंग्रजांच्या हाती लागू नये ही तिची इच्छा पूर्ण झाली. राणी गेली मात्र तिचा पराक्रम त्रिखंडात गाजला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community