CM Eknath Shinde : लोअर परळ पुलाच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची आदित्य ठाकरेंवर टीका; म्हणाले…..

मुंबईतला लोअर परेल इथल्या उभारलेल्या नवीन रेल्वे उड्डाणपुलाची त्याचे खरे तर उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते.

168
CM Eknath Shinde : लोअर परळ पुलाच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची आदित्य ठाकरेंवर टीका; म्हणाले.....
CM Eknath Shinde : लोअर परळ पुलाच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची आदित्य ठाकरेंवर टीका; म्हणाले.....

मुंबईतल्या डीलाईल रोडच्या पुलाचे उद्घाटन शनिवारी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे युवा नेते आ. आदित्य ठाकरे यांनी केले खरे. पण आता यावरुन राजकरण तापत असून फक्त सुडाचे राजकरण उध्दव ठाकरे कुटुंबियांकडून मुंबईत खेळले जात असून त्याचे पडसाद सर्व सामान्य मराठी कुटुंबियांवर पडेल की काय अशी दाट शंका येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी शनिवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केला. (CM Eknath Shinde)

त्याचे झाले काय काय की, मुंबईतला लोअर परेल इथल्या उभारलेल्या नवीन रेल्वे उड्डाणपुलाची त्याचे खरे तर उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. ते तसे मनपा आयुक्त यांनीही घोषित केले होते. पण अचानकपणे आज सेना नेते आदिय ठाकरे यांनी या पुलाचे उद्घाटन केले. पण खरं तरं हा रेल्वे उड्डाण पूल असल्याने याची चाचणी रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असताना वेस्टर्न रेल्वेने ते अचानकपणे मुंबई महानगर पालिकेच्या इंजिनियरिंग अधिकाऱ्यांवर ढकलले. त्यामूळे मग नेमके उद्घाटन करायचे कोणी या संभ्रमात सरकार असताना आज शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी या पुलाचे थेट उद्घाटन करून एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच थेट निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. (CM Eknath Shinde)

शिवसेना उबाठा नेते, युवासेना अध्यक्ष, आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत डिलाईल रोडचा लोअर परळ पुलाच्या राजकारणावरून शिंदे सरकारवर सडकून टीका केलीय. पुलाचे बेकायदेशीपणे उद्घाटन केल्याचा आरोप केला जात आहे. पालिका प्रशासनने दबावान एफआयआर दाखल केला आहे. माझ्यावर आणि सहकार्यावर गुन्हे दाखल केले आहेत. लोकांसाठी आम्ही लढतोय म्हणून गुन्हे दाखल केले. लेनच काम झालं असताना या सरकारला वेळ नाही म्हणून उदघाटन करत नाहीत. एक लेन सुरु केली तेव्हा देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (CM Eknath Shinde)

माझ्यावर गुन्हे दाखल केले, माझ्या आजोबांना अभिमान वाटला असता लोकांसाठी गुन्हे घेतले.आमचं म्हणणं आहे दोन्ही पालक मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा. येथील आयुक्तांना बाहेर जायचं आहे प्रमोशन घेऊन. त्यांच्यावर अनेक आरोप आहेत तरी त्यांची चौकशी का करत नाही? अशी विचारणाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केली. रस्ते, स्ट्रीट फर्निश्चर अशे अनेक घोटाळे याने केलेत.त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे सोडून आमच्यावर गुन्हे दाखल करतात. ३१ डिसेंबर नंतर बेकायदेशीर मुख्यमंत्री जातील त्यांना राज्यपालांनी समज द्यावी. नवी मुंबई मेट्रो वर आम्ही आवाज उठवला तेव्हा ती सुरु केली, याकडेही त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा आततायीपणा)

पालिका कर्मचा्यांना आम्ही बोलल्यावर बोनस दिला. समृद्धी वरून मुख्यमंत्री आणि सरकार वर गुन्हा दाखल करा.एक वेळ सांगत होते भाजप लाल दिवे नको. मग आता व्हिआयपी साठी लोकांना का त्रास देता. माझ्यावर दबावाखाली गुन्हा दाखल केला गेलाय. त्यामूळे आता एकच सांगतो २०२४ साली विधानसभेवर आमचाच भगवा फडकेल आणि ज्यावेळी आम्ही सत्तेत आलो एक मात्र खरं की, भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणारच. मात्र मुंबई मनपात आम्ही घोटाळे केलेत असे तुम्ही रोज बोंबलताना मग मुंबईकारंसाठी आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्ही तयार आहोत, असे खुले आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. (CM Eknath Shinde)

आता हे सरकार बाद होणारच. संविधानाने निकाल दिले तर सरकार पडेल. परंतू समजा राजकारणाने काही दगा केलाच तर मात्र त्यांचाच बाजूने निकाल लागेल आणि मग असे झाले तर सत्ताधीशांनी तिथं बसून या चांगली तरी कामं करावी. मात्र एक त्यांनी लक्षात ठेवावे की, आम्ही लेचेपेचे नाही…वेळ आल्यास आमच्यावर मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढताना गुन्हे दाखल झाले तर आम्हाला अभिमानच आहे, असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.