एकदिवसीय (World Cup 2023 Final) विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच रविवार १९ नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या अंतिम सामन्याबद्दल क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देश आणि जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती हा सामना पाहण्यासाठी येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
अशातच आता गुगलनेही आपल्या शैलीत भारत आणि ऑस्ट्रेलिया (World Cup 2023 Final) संघाला त्यांच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने एक खास डुडल बनवून शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या डूडलचे स्पष्टीकरण देताना गुगलने म्हटले आहे की, “आजचे डूडल हे भारत आणि ऑस्ट्रेलिया (World Cup 2023 Final) संघाला विश्वचषकातील त्यांच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देणारे आहे.
यावर्षी भारताने अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, (World Cup 2023 Final) बांगलादेश, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेसह दहा राष्ट्रीय संघांचे यजमानपद भूषवले.
आजच्या अंतिम फेरीतील खेळाडूंना आमच्याकडून शुभेच्छा!”
(हेही वाचा – Ind vs Aus World Cup Final : भारतीय संघाचा १० सामन्यांचा अपराजित प्रवास)
भारताने आयोजित केलेल्या या वर्षीच्या स्पर्धेत, दहा राष्ट्रीय संघांच्या क्रिकेट कौशल्याचे प्रदर्शन पाहायला मिळाले. प्रत्येक संघ (World Cup 2023 Final) अंतिम सामन्यासाठी मेहनत करतांना दिसला. या सर्व संघांचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, कारण या स्पर्धेच्या गट टप्प्यात ४५ सामने अत्यंत चुरशीने खेळले गेले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community