Crime : धरमपेठ येथील अंबाझरी पबमध्ये बाउन्सरसोबत जोरदार हाणामारी; परिसरात दहशत

पोलिसांनी काही जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

128
Sessions Courts: अपमानाचा सूड उगवण्यासाठी ३ महिन्यांच्या चिमुरडीची हत्या करणाऱ्या तृतीय पंथीयाला फाशीची शिक्षा
Sessions Courts: अपमानाचा सूड उगवण्यासाठी ३ महिन्यांच्या चिमुरडीची हत्या करणाऱ्या तृतीय पंथीयाला फाशीची शिक्षा

धरमपेठ येथील एका बहुचर्चित पबमध्ये प्रवेश करण्याच्या मुद्द्यावरून पब संचालकासोबत जोरदार हाणामारी झाली. या वादामुळे एका आरोपीने पिस्तूल काढल्याचीही येथे चर्चा आहे. यामुळे धरमपेठ परिसरात दहशत निर्माण झाली होती. ही घटना शनिवारी रात्री उशिरा धरमपेठ परिसरात घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ परिसरात दोन पब आहेत. येथे सॅटर्डे नाईटला मोठी रक्कम घेऊन तरुण-तरुणींना प्रवेश दिला जातो. तेथे मद्यपान आणि इतरही कार्यक्रम होतात. उच्चभ्रू तरुण-तरुणी येथे येत असल्याने गुन्हेगारांचीही त्यांच्यावर नजर असते.

(हेही वाचा – World Cup 2023 Final : गुगलने खास ‘डुडल’ बनवून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाला दिल्या शुभेच्छा )

शनिवारी, १९ नोव्हेंबरला रात्री ११ ते ११:३०च्या सुमारास एक पबमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना तिथे एन्ट्री नाकारल्याने तिथेही एन्ट्री नाकारल्याच्या कारणावरून त्यांच्यासोबत पब संचालक आणि बाऊन्सरचा जोरदार वाद झाला. त्यानंतर या टोळीतील आरोपींनी आपल्या काही गुंड साथीदारांना बोलवून घेतले. जोरदार हाणामारीनंतर यावेळी एका आरोपींनी आपल्या काही गुंड साथीदारांना बोलवून घेतले. यामुळे पबमध्ये गोंधळ निर्माण झाला. तरुणींचा आरडाओरडा सुरू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काही जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

पोलीस या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. हे फुटेज तपासून कारवाईचे स्वरुप ठरवण्यात येईल, अशी माहिती अंबाझरी पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.