World Cup 2023 Final : वर्ल्ड कपच्या मेगा फायनलवर पावसाचं सावट?

139
World Cup 2023 Final : वर्ल्ड कपच्या मेगा फायनलवर पावसाचं सावट?

तब्बल 20 वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया (World Cup 2023 Final) या दोन संघांमध्ये आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यासाठी लढत होणार आहे. दोन्ही संघ रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील.

वीस वर्षांपूर्वी म्हणजेच 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून (World Cup 2023 Final) तिसऱ्यांदा वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली होती. भारताची रोहित सेना आज त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

(हेही वाचा – World Cup 2023 Final : गुगलने खास ‘डुडल’ बनवून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाला दिल्या शुभेच्छा)

दरम्यान आजच्या सामन्यात पावसाने अडथळा आणल्यास पुढे काय होईल? आज अहमदाबादमधील हवामान कसं असेल, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आज अहमदाबादमध्ये (World Cup 2023 Final) आकाळ निरभ्र राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज अंतिम सामन्याच्या दिवशी हवामान स्वच्छ राहणार आहे. आज दुपारचे तापमान 32°C च्या आसपास असणे अपेक्षित आहे, हळूहळू सूर्यास्ताच्या वेळी तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे, तेव्हा कमाल तापमान 28°C पर्यंत कमी होईल आणि त्यानंतर तापमानात आणखी घट होईल.

(हेही वाचा – Ind vs Aus, World Cup Final : संघर्ष करून अंतिम सामन्यात पोहोचलेली ऑस्ट्रेलिया की, वर्चस्व गाजवलेला भारतीय संघ? १.३ लाख प्रेक्षकांच्या साक्षीने कुणाला मिळणार विजेतेपदाची माळ?)

आज सामन्याच्या दिवशी पावसाची कोणतीही शक्यता नाही. अहमदाबादमध्ये आर्द्रता (World Cup 2023 Final) सुमारे 33 टक्के असेल ती संध्याकाळनंतर अंदाजे 60 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

अशातच नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी आतापर्यंत या स्पर्धेत फलंदाज (World Cup 2023 Final) आणि क्षेत्ररक्षक दोघांसाठी चांगली ठरली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या त्रिकूटासमोर टिकणं कांगांरूसाठी कठीण जाईल. या स्टेडियममध्ये कोरडा आणि कणखर पृष्ठभाग वेगवान गोलंदाजीसाठी पोषक ठरेल. (World Cup 2023 Final)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.