Maratha Reservation: कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडाल; जाणून घ्या माहिती…

283
Maratha Reservation: कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडाल; जाणून घ्या माहिती...
Maratha Reservation: कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडाल; जाणून घ्या माहिती...

सध्या महसूल, ग्रामपंचायत, शिक्षण, पोलीस अशा सर्वच शासकीय विभागाकडील (Govt Department) १९६७ पूर्वीच्या कुणबी (Kunbi Certificate) नोंदी तपासणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात सर्वाधिक कुणबी नोंदी नगर, धुळे, पुणे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, जालना या जिल्ह्यांमध्ये आढळल्या आहेत. आतापर्यंत ५ कोटींपर्यंत दस्ताऐवज तपासून झाले असून त्यात ४ लाखांपेक्षा जास्त नोंदी आढळल्या आहेत. (Maratha Reservation)

सोलापूर जिल्ह्यात जवळपास २२ हजार नोंदी आढळल्या असून ९ नोव्हेंबरपासून शाळांमधील नोंदी तपासल्या जात आहेत. वंशावळ जुळलेल्या अर्जदारांना कागदपत्रांसह तहसीलदारांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर संबंधिताला ४५ दिवसांत जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू आहे.

(हेही वाचा – Crime : धरमपेठ येथील अंबाझरी पबमध्ये बाउन्सरसोबत जोरदार हाणामारी; परिसरात दहशत )

आठ लाख दाखल्यांच्या तपासणीत १६४ नोंदी ‘कुणबी’ आढळल्या असून अद्याप तपासणी सुरूच आहे. ३ डिसेंबर रोजी सर्वच जिल्ह्यातील नोंदीचा अहवाल राज्य सरकारला पाठविला जाणार आहे. वंशावळ जुळवून उर्वरित कागदपत्रे असल्याशिवाय जात प्रमाणपत्र दिले जात नाही. परिपूर्ण प्रस्ताव दाखल केलेल्यांना एका महिन्यातच जात प्रमाणपत्रे दिली जात आहेत.

अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत ?
– वंशावळ (वडील, आजोबा, पणजोबा) काढून त्याची पुराव्यानिशी जुळवावी लागणार
– अर्जदाराचा रहिवासी दाखला
– शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
– अर्जदाराचे आधारकार्ड, रेशनकार्ड
– जन्म- मृत्यू नोंदीचा १९६७ पूर्वीचा पुरावा
– कुटुंबातील व्यक्तीचे जात किंवा जात वैधता प्रमाणपत्र (बंधनकारक नाही)

अद्याप तपासणी सुरूच…
मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे.
८ लाख दाखल्यांच्या तपासणीत १६४ नोंदी ‘कुणबी’ आढळल्या असून अद्याप तपासणी सुरूच आहे. ३ डिसेंबर रोजी सर्वच जिल्ह्यातील नोंदीचा अहवाल राज्य सरकारला पाठविला जाणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.