देशाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (D.Y. Chandrachud) यांनी पदभार घेतल्यापासून एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. नुकतीच त्यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल समाज माध्यमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देशातील न्यायालयाशी संबंधित समस्या आणि केलेल्या सुधारणांबाबत माहिती दिली.
कार्यकाळ पूर्ण झाल्याबाबत ‘इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. यावेळी डी.वाय. चंद्रचूड म्हणाले की, ज्या दिवशी मी शपथ घेतली होती त्या दिवशी मी न्यायालयाचे सदस्य, बार आणि सर्वांना सांगितलं की, एका झटक्यात समस्या सोडवण्यासाठी मी जादूगार नाही. तरीही न्यायालयांवर परिणाम करणाऱ्या दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची तयारी मी दाखवली.
(हेही वाचा – Ind vs Aus, World Cup Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी कोण असणार मैदानावरील पंच? )
पुढे ते म्हणाले की, सगळ्यात अगोदर माझ्या खंडपीठातील माझ्या सहकाऱ्यांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेतली. त्यांनी मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी एक कृती आराखडा तयार केला. त्यासाठी न्यायिक प्रक्रियेतील अधिकारी, अभ्यासक आणि संशोधकांची एक टीम तयार केली. त्यामुळे काहीअंशी काम उभं करता आलं.
न्यायदानाच्या प्रक्रियेत तंत्रज्ञाना प्रभावी वापर
”न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि खटले वेगाने निकाली लावणं आवश्यक आहे. मागील वर्षभरामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि न्यायपालीकेतील कामकाजामध्ये बरीच सुधारणा झाली आहे. न्यायिक पक्षाबद्दल सांगायचं झालं तर, वर्षभरात साधारण ५० हजार प्रकरणांचा निपटारा करण्यात आलेला आहे. हा आकडा त्याच कालावधीमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांइतका आहे.”
कार्यवाहीचं लाईव्ह स्ट्रीमिंग…
सोशल मीडियाने न्यायपालिकेच्या कामाजावर लक्ष केंद्रित केलं आहे. यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. न्यायाधीशांनी केलेली विधानं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. कोर्टात सुरू असलेल्या कार्यवाहीचं लाईव्ह स्ट्रीमिंग होतं. त्यामुळे आतमध्ये नेमकं काय होतं आणि न्यायाधीश नेमकं काय करतात; याचा परिणाम दिसून लागला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community