World Cup 2023 Final : भारताविरुद्ध कांगारूंचे ‘हे ७ शिलेदार’ ठरू शकतात भारी

188
World Cup 2023 Final : भारताविरुद्ध कांगारूंचे 'हे ७ शिलेदार' ठरू शकतात भारी

एकदिवसीय (World Cup 2023 Final) विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच रविवार १९ नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या अंतिम सामन्याबद्दल क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देश आणि जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती हा सामना पाहण्यासाठी येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

भारताने सलग दहा विजय मिळवून अंतिम फेरीत (World Cup 2023 Final) प्रवेश केला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताचे पारडे काहीसे जड असले तरी, ऑसी संघाला (Australia) कमी समजण्याची चूक टीम इंडिया नक्कीच करणार नाही. कारण ऑस्ट्रेलियाच्या टॉप-7 फलंदाजांपैकी टीम इंडिया विरुद्ध चार फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. काही फलंदाज सरासरीमध्ये उत्कृष्ट आहेत तर काही स्ट्राईक रेटच्या बाबतीत आघाडीवर आहेत.

(हेही वाचा – Ind vs Aus Final : जाणून घ्या फायनलसाठी कशी असणार खेळपट्टी)

ऑस्ट्रेलियाच्या या सात शिलेदारांच्या कामगिरीवर आपण एक नजर टाकू
ट्रॅव्हिस हेड (Travis Head)

ऑस्ट्रेलियाचा हा सलामीवीर फलंदाज (World Cup 2023 Final) टीम भारताविरुद्ध आतापर्यंत काही विशेष करू शकलेला नसला तरीही अंतिम सामन्यात बरंच काही करण्याची त्याची क्षमता आहे. ट्रेविड हेडनं टीम इंडियाविरुद्ध आतापर्यंत 8 सामने खेळले असून केवळ 29.71 च्या सरासरीनं 208 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 94.97 राहिला आहे. टीम इंडिया विरुद्ध ट्रॅव्हिसची सर्वोच्च धावसंख्या 51 धावा आहे.

डेव्हिड वॉर्नर (David Warner)

डेव्हिड वॉर्नर हा भारतीय संघासाठी नेहमीच अडचणीचं कारण ठरला आहे. (World Cup 2023 Final) वॉर्नर मैदानावर उतरला की, धावांचा पाऊस ठरलेलाच. वॉर्नर याने टीम इंडिया विरुद्धच्या 26 सामन्यांच्या 25 डावांमध्ये 50.62 च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीनं 1215 धावा केल्या आहेत. या काळात त्याने तीन शतकं आणि नऊ अर्धशतकं झळकावली आहेत. त्यानं टीम इंडियाविरुद्ध 98.54 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. त्याला भारतीय मैदानावर खेळण्याचा भरपूर अनुभव आहे.

(हेही वाचा – World Cup 2023 Final : गुगलने खास ‘डुडल’ बनवून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाला दिल्या शुभेच्छा)

मिचेल मार्श (Mitchell Marsh)

मिचेल मार्श हा अष्टपैलू खेळाडू टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाच्या (World Cup 2023 Final) एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक फलंदाजी सरासरीनं धावा करण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. त्यानं टीम इंडियाविरुद्ध 65.42 च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीनं धावा केल्या. मिचेल मार्शनं टीम इंडियाविरुद्धच्या 11 वनडे सामन्यांच्या 10 डावांमध्ये आतापर्यंत 458 धावा केल्या आहेत. टीम इंडिया विरुद्ध त्याचा स्ट्राईक रेटही उत्कृष्ट आहे. तो 116 च्या स्ट्राईक रेटनं धावा करतो.

स्टिव्ह स्मिथ (Steve Smith)

ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज फलंदाज दीर्घकाळ भरताविरुद्ध (World Cup 2023 Final) चांगला खेळ करत आहे. त्यानं टीम इंडिया विरुद्धच्या 28 सामन्यांच्या 24 डावांमध्ये 54.41 च्या मजबूत फलंदाजीच्या सरासरीनं 1306 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेटही 100.84 राहिला आहे. स्मिथनं टीम इंडिया विरुद्ध आतापर्यंत 5 शतकं आणि 6 अर्धशतकं झळकावली आहेत.

(हेही वाचा – World Cup 2023 Final : वर्ल्ड कपच्या मेगा फायनलवर पावसाचं सावट?)

मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne)

कसोटी क्रिकेटच्या या दिग्गज खेळाडूनं एकदिवसीय सामन्यांमध्ये (World Cup 2023 Final) टीम इंडियाविरुद्ध सरासरी कामगिरी केली आहे. त्यानं टीम इंडियाविरुद्ध 13 सामन्यांच्या 11 डावांमध्ये 35.18 च्या सरासरीनं आणि 89.37 च्या स्ट्राईक रेटनं 387 धावा केल्या आहेत. भरताविरुद्ध त्याची सर्वोत्तम धावसंख्या 72 आहे.

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)

ग्लेन मॅक्सवेल भारत-ऑस्ट्रेलिया वनडे इतिहासात सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेला फलंदाज आहे. मॅक्सवेलनं भारताविरुद्ध 134 च्या स्फोटक स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये (World Cup 2023 Final) सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंमध्ये स्ट्राईक रेटच्या बाबतीत त्याच्या जवळ कोणीही नाही. त्याच्यानंतर मिचेल मार्शचा नंबर लागतो ज्यानं भारताविरुद्ध 116 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. मॅक्सवेलनं भरताविरुद्धच्या 31 सामन्यांच्या 30 डावांमध्ये 941 धावा केल्या आहेत.

जोस इंग्लिस (Josh Inglis)

जोस इंग्लिस या ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाजानं या वर्षी भारतीय संघाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला आहे. त्याने टीम इंडियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले असून त्यामध्ये त्यानं 77 धावा केल्या आहेत. येथे त्याची (World Cup 2023 Final) फलंदाजीची सरासरी 25.66 आणि स्ट्राईक रेट 95 आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.