World Cup 2023 Final : अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये पण टाय झाला तर?

192
World Cup 2023 Final Ind vs Aus : ८१ धावांत भारताचे तीन गडी बाद

एकदिवसीय (World Cup 2023 Final) विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच रविवार १९ नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या अंतिम सामन्याबद्दल क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मध्यरात्री पासून क्रिकेटप्रेमींनी स्टेडिअमबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच या सामन्याला सुरुवात होईल. मात्र आजचा सामना हा सुपर ओव्हर पर्यंत गेला आणि तिथेही टाय झाला तर?

जर तुम्हाला २०१९ विश्वचषक फायनल (World Cup 2023 Final) आठवत असेल तर, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघामध्ये सुपर ओव्हर झाली होती. मात्र ती सुपर ओव्हर देखील बरोबरीत राहिली. म्हणजेच ती सुपर ओव्हर देखील टाय झाली. त्यानंतर त्या सामन्यात ज्या संघाने जास्त चौकार मारले त्या संघाला विजयी घोषित करण्यात आलं. त्यानुसार इंग्लंड या संघाने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेवर आपलं नाव कोरलं . त्यानंतर या निकालाबाबत बरेच वाद झाले होते. अशातच आता तो नियम अपडेट करण्यात आला असून इतर अनेक नियमही यावेळी खास आहेत.

(हेही वाचा – World Cup 2023 Final : वर्ल्ड कपच्या मेगा फायनलवर पावसाचं सावट?)

याच पार्श्वभूमीवर आपण यावर्षीच्या अंतिम सामन्याचे काही खास नियम जाणून घेऊया
सुपर ओव्हर

सामना बरोबरीत सुटल्यावर हा नियम (World Cup 2023 Final) वापरला जातो. पण २०१९ मध्ये सुपर ओव्हरही टाय झाली, त्यानंतर ज्या संघाने सामन्यात जास्त चौकार मारले त्या संघाला म्हणजेच इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले. मात्र यावेळी तसे होणार नाही. कारण सुपर ओव्हर टाय झाल्यास, निकाल जाहीर होईपर्यंत सुपर ओव्हरची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. म्हणजेच जोपर्यंत विजेता मिळत नाही तोपर्यंत सुपर ओव्हरद्वारे सामना खेळवला जाईल.

राखीव दिवस आणि अतिरिक्त वेळ

अंतिम सामन्यादरम्यान पाऊस आला आणि सामना (World Cup 2023 Final) रद्द करावा लागला तर उर्वरित सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला त्याच ठिकाणाहून खेळवला जाईल जिथे १९ तारखेला तो थांबला होता. याशिवाय, अतिरिक्त वेळेचा नियम असा आहे की जर पाऊस पडला तर सामना संपण्यासाठी १२० मिनिटे म्हणजे दोन तासांचा अतिरिक्त वेळ असेल. या कालावधीत सामना न झाल्यास तो राखीव दिवशी खेळवण्यात येईल. राखीव दिवशीही सामना न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

(हेही वाचा – World Cup 2023 Final : भारताविरुद्ध कांगारूंचे ‘हे ७ शिलेदार’ ठरू शकतात भारी)

डीआरएस आणि नो बॉल

यावेळी ऑटो नो बॉलचा नियम आहे, जसे की फील्ड (World Cup 2023 Final) अंपायर नो बॉल देऊ शकत नसेल तर थर्ड अंपायर नो बॉल देऊ शकतो. तर डीआरएस घेतल्यास अल्ट्रा एज, स्प्लिट स्क्रीन, हॉकआई इ. सारखेच राहतील. तसेच, दोन्ही संघांना एका डावात प्रत्येकी दोन डीआरएस मिळतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.