सध्या सर्वत्र विश्व करंडक (World Cup 2023) स्पर्धेसाठी अत्यंत उत्सुक असलेल्या क्रीडाप्रेमींनी भारावलेले वातावरण पाहायला मिळत आहे. भारताने आपला क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकावा, अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. यासाठी क्रीडा चाहत्यांनी आपापल्या परीने या सामन्यात काही ना काही अनोख्या कलाकृती साकार करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र एका चाहत्याची ही वैशिष्ट्यपूर्ण कल्पना इतकी भन्नाट आहे की, यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नाशिकच्या संजय बाजीराव रणधीर यांनी चक्क सोन्याचे चमचमते विश्व करंडक साकारले आहे. ०.०८ मिलिमीटर आणि १.७ सेंटिमीटर आकाराचे असे दोन विश्वकरंडक त्यांनी सोन्याचे तयार करवून घेतले आहेत. मुख्य म्हणजे भारतीय संघ विजेता ठरल्यास हे विश्वकरंडक कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज विराट कोहली यांना भेट स्वरुपात देण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
(हेही वाचा – Ind vs Aus, World Cup Final : कशी राहिली नरेंद्र मोदी स्टेडियमवरील इतर संघांची कामगिरी )
सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र असलेला सोन्यापासून चक्क विश्वकरंडक साकारण्याची किमया नाशिकच्या संजय रणधीर यांनी केली. उद्योजक असलेले रणधीर हे यापूर्वी सराफी व्यवसायात कार्यरत होते. या क्षेत्रातील त्यांना २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता. सध्या ते कारखाना चालवत असून, विश्वकरंडकानिमित्त निर्माण झालेला माहोल पाहता, थेट सोन्याचा विश्वकरंडक बनविण्याची संकल्पना त्यांना सुचली. यामुळे त्यांनी चक्क दोन विश्वकरंडक तयार केले.
‘किती’ मिलिग्रॅम सोन्याचा वापर…
रणधीर यांनी साकारलेला छोट्या आकाराचा ०.०८ मिलिमीटरचा विश्वकरंडक साकारण्यासाठी १५ मिलिग्रॅम सोन्याचा वापर केला. त्यापेक्षा आकाराने थोडा १.७ सेंटिमीटर आकाराची मोठी असलेली विश्वकरंडकाची दुसरी प्रतिकृती त्यांनी ५४० मिलिग्रॅम सोन्याचा वापर करून साकारली असल्याचे संजय रणधीर सांगतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community