कार्तिकी एकादशीसाठी आज रात्री दहाच्या सुमारास उजनी धरणातून भीमा नदीत (Bhima River) ४ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी, चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. नदीत सोडलेले पाणी पंढरपूरला पोहोचण्यासाठी तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धिरज साळे म्हणाले.
(हेही वाचा –PM Narendra Modi : काँग्रेसवाले एकमेकांनाच रन आउट करतात; राजस्थानच्या सभेत पंतप्रधान मोदींची तुफान फटकेबाजी )
नदीत सोडलेले पाणी पंढरपूरला वेळेत जाण्यासाठी नदीकाठचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. पंढरपुरात पाणी पोहोचल्यानंतर नदीतून पाणी सोडणे बंद केले जाणार आहे. नदीत पाणी सोडण्यापूर्वी धरणात ४४ टक्के पाणी साठा होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community