Chhagan Bhujbal : भारत जिंकणार, आनंद लुटा, बाकी सगळं डोक्यातून काढून टाका

151
Chhagan Bhujbal : भारत जिंकणार, आनंद लुटा, बाकी सगळं डोक्यातून काढून टाका

मागील काही दिवसांपासून मराठा (Chhagan Bhujbal) आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाहीये. त्यातच, अंबड येथील सभेतून देखील भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे, प्रत्येक वेळी या दोन्ही नेत्यांना माध्यमांनी गाठल्यावर आरक्षणाचा प्रश्न हमखास विचारला जातो, आणि त्यांच्याकडून त्यावर उत्तर देखील देण्यात येते. मात्र, आज भुजबळांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला.

(हेही वाचा – World Cup 2023 Final : अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये पण टाय झाला तर?)

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना मिश्किल प्रतिक्रिया दिली. “रोजचे प्रश्न बाजूला ठेवा आणि आज विश्वचषक सामन्याचा आनंद घ्या, भारत आज जिंकणार आहे.”

(हेही वाचा – World Cup 2023 Final : म्हणून रोहितला जिंकायचा आहे द्रविडसाठी वर्ल्ड कप)

नेमकं काय म्हणाले मंत्री छगन भुजबळ?

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “तुम्ही रोजच्या या सर्व (Chhagan Bhujbal) कटकटी सोडा, कारण आज विश्वचषकाचा सामना होत आहे. या सामन्याचा आनंद लुटा, बाकी सर्व काही डोक्यातून काढून टाका. तसेच आमच्या देखील काही घालू नका, बाकीच्यांना देखील डोक्यातून काढायला सांगा. तसेच, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा विश्वचषक सामना एन्‍जॉय करा. भारत जिंकणार अशी अपेक्षा करू यात, आणि मॅचचा आनंद लुटा.” (Chhagan Bhujbal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.