World Cup 2023 Final Ind vs Aus : ८१ धावांत भारताचे तीन गडी बाद

121
World Cup 2023 Final Ind vs Aus : ८१ धावांत भारताचे तीन गडी बाद

अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (World Cup 2023 Final Ind vs Aus) यांच्यामध्ये फायनलचा थरारक सामना सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना (World Cup 2023 Final Ind vs Aus) खेळाला जात आहे. या खेळपट्टीनुसार पहिला फलंदाजी करणाऱ्या संघाला कमीतकमी ३५० धावा करणं आवश्यक आहे. तरच त्यांच्या विजयाचा मार्ग सुखकर होईल असे आकडेवारी सांगते.

या सामन्यामध्ये भारताने नेहमीप्रमाणेच आक्रमक (World Cup 2023 Final Ind vs Aus) सुरुवात केली आहे. भारताचे सलामीचे फलंदाज शुभमन गिल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतरही भारताने पहिल्या १० षटकांत ७ पेक्षा जास्तच्या सरासरीने धावसंख्या उभारली मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेला श्रेयस अय्यरही लगेच तंबूत परतल्याने भारताची अवस्था पहिल्या १० षटकांत ३ बाद ८१ अशी झाली आहे.

(हेही वाचा – World Cup 2023 Final : म्हणून रोहितला जिंकायचा आहे द्रविडसाठी वर्ल्ड कप)

आजच्या सामन्यासाठी भारताचे प्लेईंग इलेव्हन –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज. (World Cup 2023 Final Ind vs Aus)

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन –

डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवुड. (World Cup 2023 Final Ind vs Aus)

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.