पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकावरील फलाट क्रमांक चार व पाचला जोडणारा जुना पादचारी पूल रविवार ( १९ नोव्हेंबर) पासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील २० दिवस प्रवाशांना इतर पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे. (Western Railway)
अंधेरी रेल्वे स्थानकावरील तांत्रिक कामासाठी पश्चिमेकडील फलाट क्रमांक चार व पाचमधील दक्षिणी (जुना) पादचारी पूल रविवारी २० दिवसांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा : PM Narendra Modi : काँग्रेसवाले एकमेकांनाच रन आउट करतात; राजस्थानच्या सभेत पंतप्रधान मोदींची तुफान फटकेबाजी)
या कालावधीत, प्रवासी फलाट क्रमांक सहा व सातवरील पायऱ्यांचा वापर करू शकतात आणि पूर्वेकडील आणि उन्नत डेकसाठी एस्केलेटर आणि पश्चिमेकडे जाण्यासाठी इतर पादचारी पूल वापरू शकतात, असे रेल्वे सांगितले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना प्लॅटफॉर्म चार व पाचवर जाण्यासाठी पुढील २० दिवस प्रवाशांना पायपिट करावी लागणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community