ICC Cricket World Cup : या विश्वचषकात भारत प्रथमच ऑलआऊट

133

ICC Cricket World Cup  विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे आव्हान दिले आहे. एकामागोमाग अशा सलग १० सामने जिकणाऱ्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात २४० टप्पा गाठणेही प्रचंड मुश्किल झाले होते. तर या विश्वचषकात भारतीय संघ पहिल्यांदाच ऑलआऊट झाली आहे.

भारतीय संघाकडून विराट कोहलीने 54 आणि केएल राहुलने 66 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा करत भारताला वेगवान सुरुवात करून दिली, मात्र उर्वरित खेळाडूंना हा वेग कायम ठेवता आला नाही. ऑस्ट्रेलियन संघाकडून मिचेल स्टार्कने 3 बळी घेतले. पॅट कमिन्सने 2 बळी घेतले.

रोहितचे पाचव्यांदा अर्धशतक हुकले

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एकदा वर्ल्ड कपमध्ये टीमला वेगवान सुरुवात करून दिली होती. त्याने अवघ्या 31 चेंडूत 47 धावा केल्या, पण 10व्या षटकातच तो बाद झाला. रोहितने या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले.

(हेही वाचा ICC Cricket World Cup IND VS AUS : सामान्याच्या सुरुवातीला पॅट कमिन्सने केलेले बोचरे विधान पुन्हा झाले व्हायरल )

रोहित स्पर्धेच्या 11 डावांमध्ये 40 ते 49 धावा करत पाचव्यांदा बाद झाला. यापूर्वी तो बांगलादेशविरुद्ध 48, न्यूझीलंडविरुद्ध 46, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 40 आणि उपांत्य फेरीत 47 धावा करून बाद झाला होता.

कोहली 54 धावा करून बाद झाला

भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली 54 धावा करून बाद झाला. त्याला पॅट कमिन्सने बोल्ड केले. 5व्या षटकात फलंदाजीला आल्यानंतर विराटने झटपट धावा काढल्या, मात्र 3 विकेट पडल्यानंतर त्याने डाव मंदावला

(हेही वाचा ICC Cricket World Cup IND VS AUS : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष्य; खडतर परिस्थितीत शेवटपर्यंत खेळले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.