पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचा राजस्थान येथे झालेल्या प्रचार रॅलीत सुरक्षेसाठा सहभागी झालेल्या पोलिसांपैकी ६ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रविवार, १९ नोव्हेंबर रोजी राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांची प्रचार सभा झाली. त्यावेळी त्यात सहभागी पोलिसांपैकी सहा पोलिसांच्या भीषण अपघात झाला. त्यात सहा पोलिसांचा मृत्यू झाला.
या अपघातात एक गंभीर जखमी झाला. हे सर्व जण पोलीस नागौर येथून कार्यक्रमस्थळाकडे जात होते. दरम्यान, चुरू जिल्ह्यातील बागसारा गावाजवळ हा अपघात झाला. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित पोलीस कर्मचारी महिंद्रा एसयूव्ही कारने झुंझुनूच्या दिशेने जात होते. दरम्यान, चुरू जिल्ह्यातील बागसारा गावाजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. रस्त्यात दाट धुके असल्याने पोलिसांची कार ट्रकला धडकली. या दुर्घटनेत पाच पोलिसांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य एका जखमी पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. रामचंद्र (५६), सुखराम (३८), कुंभारम (३५), थानाराम (३३), सुरेश (३५) आणि महेंद्र असे मृत पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
Join Our WhatsApp Community