Central Railway : गर्दीचा ताण कमी व्हावा म्हणून कार्यालयीन वेळा बदला; रेल्वेचे संस्थांना पत्र

कार्यालयांनी दोन पाळय़ांमध्ये कर्मचारी विभागल्यास गर्दी विभाजित होईल, असा मध्य रेल्वेचा अंदाज आहे.

144
Central Railway : गर्दीचा ताण कमी व्हावा म्हणून कार्यालयीन वेळा बदला; रेल्वेचे संस्थांना पत्र
Central Railway : गर्दीचा ताण कमी व्हावा म्हणून कार्यालयीन वेळा बदला; रेल्वेचे संस्थांना पत्र

वाढत्या गर्दीचा जाच कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्यानंतर आता याला व्यापक स्वरूप यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कार्यालयांनी दोन पाळय़ांमध्ये कर्मचारी विभागल्यास गर्दी विभाजित होईल, असा मध्य रेल्वेचा अंदाज आहे. त्यासाठी ३५० संस्थांशी पत्रव्यवहार करण्यात आला असला तरी मंत्रालय, रुग्णालये, शाळा, बँका आदींमध्ये वेळा बदलण्याबाबत संभ्रमाची स्थिती असल्याचे चित्र आहे. (Central Railway)

मध्य रेल्वे मार्गावरून दररोज सुमारे ३५ ते ४० लाख प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळी तीन ते चार मिनिटांनी एक फेरी धावते. मात्र गर्दीमुळे सेवेवर ताण येतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन पाळय़ांमध्ये विभागले आहे. आता त्याचे अनुकरण करण्याची विनंतीही इतर संस्था, कार्यालयांना करण्यात आली आहे. आणखी ४०० संस्थांशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. मात्र यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांची दिनचर्या पूर्णत: बदलेल व त्याचा उत्पादकतेवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय या उपायाने लोकलमधील गर्दी खरोखर कमी होईल का, याबाबतही साशंकता आहे.

(हेही वाचा : PM Narendra Modi यांच्या प्रचार रॅलीत सहभागी ६ पोलिसांचा झाला अपघाती मृत्यू)

कर्मचाऱ्यांची दिनचर्या बिघडण्याची भीती आहे. कामाच्या वेळा बदलल्याने, कामावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तर शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आधीपासूनच अशा दोन पाळय़ांमध्ये काम करतात. त्यामुळे आता आणखी वेळा बदलणे शक्य नसल्याचे शिक्षक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कार्यालयीन वेळा बदलून गर्दीचा लोंढा खरंच कमी होईल का, असा प्रश्न आहे. रेल्वे प्रशासनाने उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर भर देण्यासह मुंबईत पूर्व-पश्चिम रेल्वे मार्ग तयार करणे आवश्यक आहे. रस्ते, मेट्रो व इतर पर्यायी मार्गानी मुंबई पूर्व-पश्चिम दिशांनी जवळ आणली पाहिजे असेही मत अनेकांनी व्यक्त केले.

(हेही वाचा :Uttarkashi Tunnel Rescue : नितीन गडकरी यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना केले आश्वस्त)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.