Hingoli Earthquake: हिंगोली येथे भल्या पहाटे भूकंपाचे धक्के

रविवारी नेपाळ आणि जम्मू-काश्मीरमधील दोडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.

178
Hingoli Earthquake: हिंगोली येथे भल्या पहाटे भूकंपाचे धक्के
Hingoli Earthquake: हिंगोली येथे भल्या पहाटे भूकंपाचे धक्के

मराठवाड्यातील हिंगोली येथे सोमवारी, २० नोव्हेंबरला पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 एवढी होती. दरम्यान या भूकंपात कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाहीये.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, हा भूकंप आज ​​(सोमवार) पहाटे ५:०९ वाजता झाला. भूकंपानंतर लोक प्रचंड घाबरले आणि घराबाहेर पडले. एनसीएसच्या म्हणण्यानुसार हा भूकंप भूगर्भात ५ किमी खोलीवर झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने त्याच्या अधिकृत एक्स पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिली आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi : “आम्ही आज आणि सदैव तुमच्यासोबत”; पंतप्रधान मोदींनी केले भारतीय संघाचे कौतुक)

महाराष्ट्रातील हिंगोलीपूर्वी १९ नोव्हेंबरच्या सायंकाळी अरबी महासागरामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रविवारी सायंकाळी ६.३६ वाजता अरबी समुद्रात झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी मोजली गेली.

रविवारी नेपाळ आणि जम्मू-काश्मीरमधील दोडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. रविवारी सकाळी ११.३० वाजता जम्मू-काश्मीरच्या दोडा येथे २.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

 An earthquake of Magnitude 3.5 on the Richter scale hit Hingoli, Maharashtra at 5:09 am today: National Centre for Seismology pic.twitter.com/OPsceoqIJw

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.