Rohit Sharma ने सांगितलं अंतिम सामन्यातील पराभवाचं कारण; म्हणाला…

231
Rohit Sharma : ‘मी खेळत राहणार जोपर्यंत….,’ रोहितने निवृत्तीची चर्चाच फेटाळली

भारताचा (Rohit Sharma) ६ विकेट राखून पराभव करून ऑस्ट्रेलियाने या विश्वचषकामध्ये अभूतपूर्व विजय मिळवला. १९७५ पासून ऑस्ट्रेलियाने १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५ असे पाच वेळा विश्वचषक पटकावला होता. आता ऑस्ट्रेलियाने २०२३मध्ये विजय मिळवत विश्वविजेता होण्याचा षटकार मारला आहे.

मात्र ऑस्ट्रेलियानं ६ विकेट्सनं भारताचा पराभव करत तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचं विजेतेपदाचं स्वप्न भंग केलं. त्यानंतर आता खुद्द कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) या पराभवामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा ?
“मला माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे”

सामन्यानंतरच्या कार्यक्रमात रोहित शर्माला (Rohit Sharma) रवी शास्त्रींनी पराभवासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता रोहित शर्मानं आपल्या सहकाऱ्यांच्या कामगिरीवर अभिमान असल्याचं ताठ मानेनं सांगितलं. “सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही. आज आम्ही विजयासाठी आवश्यक तेवढा चांगला खेळ करू शकलो नाही याची आम्हाला कल्पना आहे. पण मला संघातल्या प्रत्येकाच्या कामगिरीचा अभिमान आहे”, असं रोहित शर्मा यावेळी म्हणाला.

(हेही वाचा – ICC Cricket World Cup : १९७५ – २०२३ क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार)

सातत्याने आमचे गडी बाद होत गेले

“खरंतर आणखी २०-३० धावा झाल्या असत्या, तर कदाचित आम्हाला आणखी मदत झाली असती. जेव्हा विराट कोहली आणि के. एल. राहुल खेळत होते, तेव्हा आम्ही २७०-२८० धावांचं लक्ष्य समोर ठेवलं होतं. पण सातत्याने आमचे गडी बाद होत गेले”, असं रोहित शर्मानं (Rohit Sharma) यावेळी कबूल केलं.

(हेही वाचा – PM Narendra Modi : “आम्ही आज आणि सदैव तुमच्यासोबत”; पंतप्रधान मोदींनी केले भारतीय संघाचे कौतुक)

आम्ही चांगली फलंदाजी केली नाही

मला वाटतं संध्याकाळी खेळपट्टी फलंदाजीसाठी आणखी चांगली झाली. हे असं होईल याची आम्हाला कल्पना होती. पण अर्थात, या पराभवासाठी मला (Rohit Sharma) ते कारण द्यायचं नाहीये. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. या विजयाचं श्रेय नक्कीच ट्रेविस हेड व मार्नस लाबुशेन यांच्या भागीदारीला जातं”, असं रोहितनं मान्य केलं. (Rohit Sharma)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.