PMFME Scheme : नाशवंत पदार्थांवर प्रक्रिया करणारी योजना शेतकऱ्यांच्याच फायद्याची ,कसा करायचा अर्ज?

192
PMFME Scheme : नाशवंत पदार्थांवर प्रक्रिया करणारी योजना शेतकऱ्यांच्याच फायद्याची ,कसा करायचा अर्ज?
PMFME Scheme : नाशवंत पदार्थांवर प्रक्रिया करणारी योजना शेतकऱ्यांच्याच फायद्याची ,कसा करायचा अर्ज?

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची आणि उद्योगधंद्याची कास धरली पाहिजे असा सल्ला कृषीतज्ज्ञांकडून नेहमीच दिला जातो. शेतीसोबत जोडधंदा करण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) सुरू केली असून, या योजनेंतर्गत तब्बल १० लाखांपर्यंत अनुदान मिळते.या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. एमआयएस पोर्टलवर अर्ज करावा लागतो. कृषी विभागाकडून ही योजना राबविली जाते. ठाणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी लागणारी पात्रता काय अर्ज कसा करायचा हे आपण जाणून घेऊ . (PMFME Scheme )

कुजणाऱ्या, नष्ट होणाऱ्या शेतीमालामुळे शेतक-यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दड बसत आहे. त्यामुळे शेतकरी डबघाईला येऊन आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने आता केंद्राच्या आर्थिक मदतीतून प्रत्येक जिल्ह्यात ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत कोणतेही फळ किंवा पिकावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो.

(हेही वाचा : Bogus Doctor: रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरवर पोलिसांकडून कारवाई)

काय आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना? 
  • असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना संघटित क्षेत्रात आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये नाशवंत कृषी माल जसे फळे व भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाला पिके, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, किरकोळ वन उत्पादने अळिवी इ. चा समावेश आहे.

•  या उद्योग उभारणीसाठी एकूण खर्चात केंद्र ६० टक्के व राज्य सरकार २० टक्के आर्थिक मदत करीत आहे. योजना         कालावधी २०२०-२१ ते २०२४-२५ हा पाच वर्षांचा कालावधी आहे. यामध्ये वैयक्तिक व गट लाभार्थी जसे शेतकरी गट,      कंपनी, संस्था, स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी आदीसह नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना मदत करण्यासाठी       ही योजना आहे. (PMFME Scheme)

कोणाला करता येईल अर्ज ?
किमान १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या शेतकरी, महिला, बेरोजगार युवक वैयक्तिक मालकी, भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ),शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता गट (एसएचजी), उत्पादक, सहकारी संस्था, गैर सरकारी संस्था (एनजीओ), खासगी कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आदींना अर्ज करून योजनेचा लाभ घेता येईल.

आवश्यक कागदपत्रे कोणती

आधारकार्ड, पॅनकार्ड, जागेचा पुरावा, पुरावा बँक खात्याचा तपशील, उद्योगासाठी लागणाऱ्या मशिनरीचे दरपत्रक, वीजबिल, भाड्याची जागा असल्यास करारनामा, ही कागदपत्रे आवश्यक आहे.

ठाणे जिल्ह्यात प्रतिसाद वाढतोय
ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत १९२ अर्ज प्राप्त झाले असल्याचे ठाणे जिल्हा कृषी विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते त्यामुळे जास्तीतजास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा असेही कृषी विभागाचे म्हणणे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.