आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा (Ind vs Aus Final Match) अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी होती. दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २० वर्षांनी आमनेसामने आले होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने उत्तम खेळ करत हा अंतिम सामना जिंकला.
यानंतर मोहम्मद सिराज व कर्णधार रोहित शर्मा यांना भावना आवरणंही कठीण जात होतं. भारताला (Ind vs Aus Final Match) अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला असला, तरी भारतीय क्रिकेट चाहते आपल्या संघाच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे भारतीय चाहते टीम इंडियाला विश्वास देत असताना दुसरीकडे खुद्द संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये काय वातावरण होतं याचा एक व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
(हेही वाचा – Virender Sehwag : भारतीय संघाच्या फलंदाजीवर सेहवागची नाराजी; म्हणाला …)
बीसीसीआयनं (Ind vs Aus Final Match) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रत्येक सामन्यानंतर भारतीय संघाकडून उत्तम क्षेत्ररक्षणसााठी दिल्या जाणाऱ्या ‘मेडल सेरेमनी’ची दृश्य आहेत. अगदी पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत. पहिल्या सामन्यात विराट कोहलीला हे मेडल देण्यात आलं होतं. अंतिम सामन्यातही विराट कोहलीचा हे मेडल देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनंतर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी सर्व खेळाडूंचं मनोबल वाढवलं.
From our first medal ceremony to the last – thank you to all the fans who’ve given us a lot of love for it 💙
Yesterday, we kept our spirits high in the dressing room and presented the best fielder award for one final time.
Watch 🎥🔽 – By @28anand#TeamIndia | #CWC23
— BCCI (@BCCI) November 20, 2023
(हेही वाचा – ICC Cricket World Cup IND VS AUS : सामन्याच्या सुरुवातीला पॅट कमिन्सने केलेले बोचरे विधान पुन्हा झाले व्हायरल )
“मित्रांनो, मला माहिती आहे की हे सगळं कठीण आहे आणि आपल्या सर्वांनाच (Ind vs Aus Final Match) या गोष्टीचं दु:ख होतंय. पण त्यालाच तर खेळ म्हणतात. आपण जे जे शक्य होतं, ते सगळं अगदी व्यवस्थित केलं. पण तरी सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लागला नाही. पण मला वाटतं जसं राहुल द्रविडनं सांगितलं, आपल्या सगळ्यांना स्वत:चा अभिमान वाटायला हवा. मी या संघातल्या प्रत्येक खेळाडूचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. तुम्ही क्षेत्ररक्षणात स्वत:ला झोकून दिलं. क्षेत्ररक्षणात प्रचंड ऊर्जा आणली. सगळ्यांनी उत्तम कामगिरी केली”, असं दिलीप ड्रेसिंग रूममध्ये म्हणाले. (Ind vs Aus Final Match)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community