Pune 5 Star Hotels : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतील ‘ही’ आहेत पंचतारांकित हॉटेल्स, जाणून घ्या..

282
Pune 5 Star Hotels : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतील 'ही' आहेत पंचतारांकित हॉटेल्स, जाणून घ्या..
Pune 5 Star Hotels : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतील 'ही' आहेत पंचतारांकित हॉटेल्स, जाणून घ्या..

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी (Pune 5 Star Hotels) म्हणून पुणे शहराची ओळख आहे तसेच आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक दृष्ट्याही हे महत्त्वाचं शहर आहे. राज्यासह देशभरातून अनेक लोक पुण्यात कामानिमित्त येत असतात. तेव्हा प्रत्येकाला राहण्यासाठी परवडणाऱ्या दरात रिसॉर्ट पाहिजे असतात. पुण्यात अनेक मोठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत. यापैकी जाणून घ्या ५ फाईव्ह स्टार्स हॉटेल्सची माहिती. 

हल्ली नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त बहुतांश लोकं घरापासून दूर राहतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं सगळ्यांचंच दैनंदिन जीवनमान व्यस्तच असतं. रोजची कामं, त्यासाठी काढावा लागणारा वेळ, करावा लागणारा प्रवास, कामाचा ताण…हा एक वेगळाच मुद्दा आहे; पण या सगळ्या दररोजच्या धावपळीत कधीतरी स्वत:साठी वेळ काढावा. आपल्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत भटकंती करावी आणि त्यानंतर पोटपूजेकरिता किंवा अगदी एक-दोन दिवसांचा वेळ प्रियजनांसोबत व्यतित करण्याकरिता तुम्हाला एखाद्या चांगल्या…दर्जेदार आणि अर्थातच 5 स्टार हॉटेलमध्ये जावंसं वाटत असेल, तर खुशाल जाऊ शकता. अशावेळी जर तुम्ही पुण्यात असाल आणि त्यातूनही खवय्यै असाल…शाकाहारी, मांसाहारी, इटालियन, कॅंडल लाईट डिनर, कॉंन्टिनेंटल, दाक्षिणात्य, युरोपियन…अशा तुम्हाला हव्या त्या पद्धतीच्या जेवणाचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

पुण्यात विविध ठिकाणांहून लोकं येत असतात. अनेकांना पुण्यातील चांगल्या हॉटेल्सची माहिती नसते. एवढंच कशाला काही जणं खुद्द पुण्यातील नागरिकही असतात, त्यांनाही स्थानिक ठिकाणी असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेल्सची माहिती असणे आवश्यक असते, तर काही वेळा आपल्या प्रिय व्यक्तिसोबत एखाद्या शांत आणि छान जागी जावं, असं वाटत असेल; तरी या परिसरातील हॉटेल्सची माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी जोडप्यांसाठी खास सजावट आणि डिनरची व्यवस्था केलेली असते, तर पाहूया…’पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्स’विषयी !

कोकोपारा हॉटेल
पुण्यातील वाडगाव शेरी येथील खराडी मांढवा पुलाखाली असलेलं ‘कोकोपारा’ हे बुफे लंचसाठी प्रसिद्ध असलेलं हॉटेल आहे. सर्वात स्वादिष्ट हॉटेल अशी याची ख्याती आहे. कॉन्टिनेंटल, नॉर्थ इंडियन, युरोपियन पदार्थांसाठी कोकोपारा हे प्रसिद्ध हॉटेल आहे. याच्या चहूबाजूला हिरवळ आहे. कँण्डल लाईट डिनरचा जर विचार करत असाल, आणि त्यासोबत लाईव्ह म्युझिक हवं असेल, येथे चांगला वेळ जाऊ शकेल. ११०० रुपयांत एखादं जोडपं येथे पोट भरून जेवू शकतं.

Photo courtesy@Google 42

इव्विया स्काय लंग
झगमगती रोषणाई, गाण्याची फर्माईश तसेच डिनर डेटचा विचार करत असाल, तर क्राऊन प्लाझा येथे असलेलं इव्विया स्काय लंग हे हॉटेल उत्तम आहे. येथील हॉटेलची रचना पाहताना तुम्ही जगापासून कुठेतरी लांब आला आहात, याचा भास होतो. येथे तुम्हाला हव्या त्या गाण्याची फर्माईश तुम्ही करू शकता. इथलं वैशिष्ट्य म्हणजे जेवणासाठी केलेली इथली आरासही लाजवाब असते. चॉकलेट फिरणी, लँब स्ट्यू, दह्याचे कबाब आणि मर्गी कलम कबाब या पदार्थांची चव येथे येऊन आवर्जून चाखून बघू शकता.

Photo courtesy@Google 43

ट्रिकाया हॉटेल
प्रसिद्ध आणि फाईव्ह स्टार रेस्टॉरंटपैकी हे एक रेस्टॉरंट आहे. पुण्यातील बधवान परिसरात असलेले हे एक हॉटेल आउटडोअर सिटिंग डिनरसाठीही प्रसिद्ध आहे. या हॉटेलची रचना, सजावट इतकी आल्हाददायक आणि प्रसन्न करणारी आहे की, दिवसभराचा थकवा नक्कीच कमी व्हायला मदत होईल. कधी कधी आपल्याला शांत, एकाकी जागी जावे जेणेकरून निवांतपणा मिळू शकेल, अशा वेळी या हॉटेलचा पर्याय निवडू शकता. चायनिज थाय, मलेशिअन, इंडोनेशिया, असे परदेशी फूड इथे येणाऱ्या खवय्यांना चाखता येतात. त्यात पोर्क रिब्स, डीम सम, ड्रकन पोर्क, पनीर आणि चिकन सटाय हे येथील विशेष पदार्थ आहेत.

Photo courtesy@Google 45

कार्निव्हल रेस्टॉरंट
पुण्यातील फातिमा नगरच्या मुंढवा रोडवरील कार्निव्हल रेस्टॉरंट या हॉटेलला आउटडोअर डिनरसाठी सगळ्यात जास्त मागणी असते. शिशा, चारकोल चिकन, मुर्घ मुस्सलम, हराभरा कबाब आणि चिकन रारा हे फूड येथे येऊन नक्कीच चाखण्यासारखे आहेत.

Photo courtesy@Google 46 1

ऑर्किड हॉटेल
बंगळुरू-पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर हे हॉटेल वसलेलं आहे. पर्यावरणपूरक हॉटेल मोठ्या महामंडळांपासून, प्रमुख सरकारी संस्था आणि प्रमुख शैक्षणिक आणि संशोधन संस्थांपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. सुंदर शॉपिंग मॉल्स, उत्कृष्ट उपहारगृहे आणि करमणुकीची केंद्रे बालेवाडी हाय स्ट्रीटपासून हे हॉटेल काही क्षणांच्या अंतरावर आहे. सुट्टी घालवण्यासाठी येणारे प्रवासी आणि कुटुंबिय यांच्यासाठी हे एक आदर्श हॉटेल समजले जाते. आगा खान पॅलेस आणि शनिवार वाडा यासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळे पाहायला येणारे पर्यटक या हॉटेलला आवर्जून भेट देतात. ग्राहकांच्या
कॅलरीजची काळजी घेणारे, ताजे अन्नपदार्थ, अत्याधुनिक फिटनेस सेंटर, जलतरण तलाव, बालेवाडी स्टेडियम इत्यादी या हॉटेलची वैशिष्ट्ये सांगता येतील.

Photo courtesy@Google 47

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.