Uttarkashi Tunnel Accident : बोगद्यात अडकलेल्यांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न, पंतप्रधानांनी घेतला आढावा

153
Uttarkashi Tunnel Accident : बोगद्यात अडकलेल्यांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न, पंतप्रधानांनी घेतला आढावा
Uttarkashi Tunnel Accident : बोगद्यात अडकलेल्यांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न, पंतप्रधानांनी घेतला आढावा

 उत्तरकाशीत गेल्या नऊ दिवसांपासून सिल्क्यराजवळ बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करून मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली आहे. केंद्र आणि राज्य संस्थांच्या परस्पर समन्वयाने कामगारांना सुरक्षितपणे बाहेर  काढले जाईल. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य राखण्याची गरज आहे. (Uttarkashi Tunnel Accident)

यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले की,आपण स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून बचाव कार्यावर सतत लक्ष ठेऊन आहे.  तेथे वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे. बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुखरूप असून त्यांना लवकर बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य आणि केंद्रीय यंत्रणा बचाव कार्यात व्यस्त 

 राज्य आणि केंद्रीय यंत्रणा परस्पर समन्वयाने आणि तत्परतेने मदत आणि बचाव कार्यात व्यस्त आहेत. या कामगारांना  सुरक्षित असून ऑक्सिजन, पौष्टिक अन्न आणि पाणी पुरवले जात आहे. तज्ज्ञांचे मत घेऊन एजन्सी मदत आणि बचाव कार्य करत आहेत.पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून तीन वेळा परिस्थितीची माहिती घेतली आहे. पीएमओ टीमनेही घटनास्थळाची पाहणी केली असून ते सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि समन्वयाचे काम करत आहे.

(हेही वाचा : Ind vs Aus Final Match : भारताच्या पराभवामागची ‘ही’ आहेत सर्वात मोठी कारणे)

कुटुंबियांचे मनोधैर्य टिकवण्याची गरज 

अडकलेल्या कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्याशी सतत संवाद साधून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशनाची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येथे येऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या कुटुंबाचा वाहतूक, भोजन, निवास आणि मोबाईल रिचार्जचा खर्च उत्तराखंड सरकार उचलणार आहे. या आपत्तीच्या काळात आपण सर्वांनी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल जपले पाहिजे.

ड्रिल दोन ते तीन दिवसांत होऊ शकते पूर्ण

बोगद्याच्या वर ड्रिलिंगसाठी जागा निवडण्यात आली आहे. ड्रिल 1.2 मीटर व्यासाची असेल. ज्याचा सेटअप येत्या २४ तासात होण्याची शक्यता आहे. आता दोन ते तीन दिवसांत ड्रील पूर्ण होऊ शकते.

(हेही वाचा :Jogeshwari : कब्र खोदण्यावरून दोन गटात तुफान राडा, जोगेश्वरीतील घटना)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.