आयसीसी विश्वचषक 2023 (Ind vs Aus Final Match) मध्ये स्फोटक सुरुवात करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावला नाही. रोहित सेनेने स्पर्धेतील सर्व म्हणजेच 10 सामने जिंकून अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला. त्यामुळे या वर्षीचा वर्ल्ड कप भारतच जिंकणार असं दिग्गजांसह चाहत्यांनाही वाटत होतं. पण, 140 कोटी भारतीयांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं.
रविवार १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये अंतिम सामना खेळला गेला. सामन्यात भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind vs Aus Final Match) नको असणाऱ्या काही चुका झाल्या आणि भारतीयांचं 12 वर्षांचं स्वप्न भंगलं.
Best of the best 😍
Revealing the official CWC23 Team of the Tournament 👇https://t.co/WBmJnsdZ0e
— ICC (@ICC) November 20, 2023
(हेही वाचा – Virender Sehwag : भारतीय संघाच्या फलंदाजीवर सेहवागची नाराजी; म्हणाला …)
या दोन (Ind vs Aus Final Match) संघांमध्ये २००३ रोजी झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही अंतिम सामना झाला होता आणि तो ऑस्ट्रेलियाने सहज जिंकला होता. या सामन्यातही सुरुवातीची काही षटके वगळता ऑस्ट्रेलियाने सामन्यावरील पकड जराही ढिली पडू दिली नाही. अखेरीस सहा गडी आणि सात षटके राखून हा सामना जिंकला.
टीम इंडियाच्या पराभवाची (Ind vs Aus Final Match) अनेक कारणं आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही संघ फ्लॉप ठरला.
(हेही वाचा – PM Narendra Modi : “आम्ही आज आणि सदैव तुमच्यासोबत”; पंतप्रधान मोदींनी केले भारतीय संघाचे कौतुक)
भारताच्या पराभवाची कारणे
१. फलंदाजी आणि गोलंदाजीचा अभाव
भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजी देखील या संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत विलक्षण बहरली होती. मात्र अंतिम सामन्यात एकाही फलंदाज किंवा गोलंदाजाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा ४७ धावा करून बाद झाला. विक्रमवीर विराट कोहली अर्धशतक झळकावून लगेचच बाद झाला. तर के. एल. राहुलच्या अर्धशतकाचा म्हणावा तसा परिणाम झाला नाही. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे इतर फलंदाज देखील अपयशी ठरले. (Ind vs Aus Final Match)
त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियासमोर केवळ २४० धावांचा डोंगर रचता आला. या सामन्यात भारताची गोलंदाजी देखील फारशी चालली नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येक २ विकेट्स घेतल्या.
Australia’s dynamic duo excelled in the field and led the charts in the #CWC23 Fielding Impact Ratings 🤩https://t.co/Vdy3NSjL4Y
— ICC (@ICC) November 20, 2023
२. फायनलचं दडपण
अंतिम सामन्यात कोहली, राहुल आणि रोहित यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला आपलं कौशल्य दाखवता आलं नाही. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या सर्वांना फायनलचं दडपण सहन करता आलं नाही आणि ते सपशेल फ्लॉप झाले. गिल आणि रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस देखील केवळ 4 धावा करून माघारी गेला. यानंतर रवींद्र जाडेजा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याच्यानंतर सूर्यकुमार सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, मात्र आधी फार लवकर विकेट गेल्याने त्यांच्यावरची जबाबदारी वाढली. त्यामुळे भारतीय फलंदाज विश्वचषक फायनलसारख्या मोठ्या सामन्याचं दडपण सहन करू शकले नाही. यापैकी कोणीही क्रिझवर थांबून जरा चांगल्या रनरेटनं धावा केल्या असत्या तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. (Ind vs Aus Final Match)
(हेही वाचा – ICC Cricket World Cup : भारताचे स्वप्न भंगले; ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेतेपदाचा ‘षटकार’)
३. हेड-लॅबुशेनची मॅचविनिंग पार्टनरशिप
२४० धावा करूनही भारतीय वेगवान गोलंदाजांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. शमीने वॉर्नरला आणि बुमराहने मार्श-स्मिथला बाद केले. ऑस्ट्रेलियाने ५० धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. पण यानंतर हेड-लाबुशेनने पूर्ण बाजी पलटवली आणि कांगारूंना सहाव्यांदा जगज्जेते बनवले. चौथ्या विकेटसाठी या दोघांमध्ये तब्बल १९४ धावांची भागीदारी झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना सहज आपल्या खिशात घातला आणि सहावेळा विश्वचषक स्पर्धेवर आपलं नावं कोरलं. (Ind vs Aus Final Match)
तसेच रोहित, विराट, बुमरा, व शमीवर अतिविसंबून राहणे आणि टॉस हरणे यामुळे देखील भारतीय संघाचे तिसऱ्यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्न भंगले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community