Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार गटावर निवडणूक आयोग नाराज; पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला

अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे, तर पदाधिकाऱ्यांचीही बोगस प्रमाणपत्रे जमा करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे. शरद पवार गटाकडून सातत्याने तेच तेच मुद्दे मांडण्यात येत आहेत.  ते वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप अजित पवार गटाने केला.

149
Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार गटावर निवडणूक आयोग नाराज; पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला
Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार गटावर निवडणूक आयोग नाराज; पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला

निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हाबाबतची सुनावणी संपली. (Sharad Pawar vs Ajit Pawar) आता २४ नोव्हेंबर रोजी पुढची सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाने (Sharad Pawar) केली आहे.

सुनावणीला उशिरा सुरुवात

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Singhvi) उशिरा पोहोचल्याने उशिरा सुनावणीला सुरुवात झाली. ते 50 मिनिटे उशिरा दाखल झाले. अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करत आहेत. शरद पवार स्वतः या सुनावणीसाठी उपस्थित असून त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. अजित पवार गटाकडून सुनावणीसाठी पार्थ पवार निवडणूक आयोगामध्ये दाखल झाले होते. त्यांच्यासह अनेक मोठे नेते आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले होते.

(हेही वाचा – MSRTC चालकांना गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्यास बंदी; महामंडळाचा नवा नियम)

तेच तेच मुद्दे मांडल्याचा आरोप

अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे, तर पदाधिकाऱ्यांचीही बोगस प्रमाणपत्रे जमा करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे. शरद पवार गटाकडून सातत्याने तेच तेच मुद्दे मांडण्यात येत आहेत. ते वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप अजित पवार गटाने केला. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आजचा युक्तिवाद संपला असून पुढची सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

शरद पवार गटाची कानउघाडणी

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Singhvi) यांची कानउघडणी केली. ज्या मुद्द्यांवर गेल्या सुनावणीत आपण युक्तिवाद केला होता त्याच प्रतिज्ञापत्रातील मुद्द्यांचा आपण पुन्हा उल्लेख करु नका, असे निवडणूक आयोगाने त्यांना सांगितले. तेच तेच मुद्दे घेतल्याने आयोगाने नाराजी व्यक्त केली.

(हेही वाचा – Sanjay Raut : आदित्य ठाकरेंच्या हातात कोणत्या ब्रॅण्डची व्हिस्की? संजय राऊतांच्या ट्विटनंतर भाजपचा पलटवार)

वकिलांमध्ये खडाजंगी

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस कुवर प्रताप सिंह हे शरद पवार गटाकडे आहेत. तसे प्रतिज्ञापत्रही त्यांनी दिले आहे. अजित पवार गटाकडून कुवर प्रताप सिंह यांची खोटी सही करून त्यांचे बोगस प्रतिज्ञापत्रक जमा करण्यात आले असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे जमा करून निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्यात येत असल्याचा दावा सरद पवार गटाकडून करण्यात आला.अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष कधी झाले? अध्यक्षपदाच्या निवडी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी कोण होते, असे प्रश्न शरद पवार गटाच्या वकिलांनी अजित पवार गटाला केले. (Sharad Pawar vs Ajit Pawar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.