धाराशिवच्या तुळजाभवानी जिल्हा स्टेडियममध्ये सोमवार, २० नोव्हेंबर रोजी रात्री महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) साठी अंतिम कुस्त्या झाल्या. या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा ६-० असा पराभव केला. सामन्याला सुरुवात होताच दोघेही अंदाज घेत होते. शिवराजने हर्षदला रेडझोन बाहेर ढकलल्याने त्याचे गुणांचे खाते उघडले. त्यांनतर पंचांनी हर्षदला पॅसिव्हटीची वाॅर्निंग दिली. त्यानंतर परत शिवराजने एक गुण कमवत मध्यंतरांपर्यंत २ गुणांची आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये परत हर्षदला बाहेर ढकलल्याने पंचांनी शिवराजला एक गुण दिला.
हर्षदच्या तगड्या अटॅकला शिवराजने उत्कृष्ट डिफेन्स करत दाद दिली नाही. परत पंचांनी शिवराजला पॅसिव्हटीची वाॅर्निंग दिली. त्यानंतर मात्र शिवराजने आक्रमक होत परत एक गुण कमावला. त्यानंतर शिवराजने खेमे डावावर दोन गुणांचा कमाई करत आपली आघाडी भक्कम केली. भारंदाजही मारण्याचा शिवराजनेे प्रयत्न केला, परंतु तो फसला. हर्षवर्धनने आक्रमकता दाखिवली असली तरी त्याला शिवराजने छेद दिला. २०१९ सालच्या महाराष्ट्र केसरीतही (Maharashtra Kesari) सदगीर व शैलेश शेळके यांच्या रुपाने असा योग घडून आला होता. योगेश्वर दत्तच्या हस्ते पारितोषिके…खिताबी लढतीतील विजेता मल्ल शिवराजला ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त याच्या हस्ते चांदीची गदा व स्कॉर्पिओ बहाल करण्यात आली. तर उपविजेत्या हर्षवर्धनला चांदीची गदा व ट्रॅक्टर प्रदान करण्यात आले. इतर वजन गटातील विजेत्यांना बुलेट व दुचाकी रोख पारितोषिकासह देण्यात आली. यावेळी राज्य कुस्तीगर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष विजय भराटे, आयोजक सुधीर पाटील, जिल्हा संघटनेचे संतोष नलावडे, वामन गाते, आमदार कैलास पाटील, माजी खासदर रविंद्र गायकवाड उपस्थित होते.
(हेही वाचा Lalit Patil : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन)
Join Our WhatsApp Community