Cricket Bookie : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर ६० हजार कोटींचा सट्टा, क्रिकेट बुकी मालामाल 

187
Cricket Bookie : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर ६० हजार कोटींचा सट्टा, क्रिकेट बुकी मालामाल 
Cricket Bookie : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर ६० हजार कोटींचा सट्टा, क्रिकेट बुकी मालामाल 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याच्या अंतिम फेरीत क्रिकेट बुकींची (Cricket Bookie) मोठी कमाई झाली आहे. या अंतिम फेरीसाठी संपूर्ण भारतात ६०० वेबसाईट आणि ४०० मोबाईल अ‍ॅपवर ६० हजार कोटींचा सट्टा लावण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ड्रीम ११ या अधिकृत वेबसाईट सह महादेव बुक शेकडो बेकायदेशीर अ‍ॅपवर हा सट्टा लावण्यात आला होता. सर्व प्रथम बेटिंग लावणाऱ्यांनी भारताला सर्वात अधिक पसंती दिली होती. मात्र भारताची हार झाल्यामुळे बेटिंग लावणाऱ्या कोट्यवधी लोकांचे हजारो कोटीचे नुकसान झाले असले तरी क्रिकेट बुकी मात्र मालामाल झाले आहे.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०२३ च्या अंतिम फेरीत पोहचलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशात रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम फेरी पार पडली. या सामन्यात ऑस्ट्रेलिया या देशाने विश्वचषक पटकावला आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या अंतिम फेरीवर भारतात सट्टेबाजीला उत आला होता. भारताची क्रिकेट टीम विश्वचषक जिंकतील अशी भाबडी आशा भारत वासीयांना होती. भारताच्या संघाने देखील पूर्ण तयारी केली होती, भारतीय संघच अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया चितपट करील असा चित्र संपूर्ण देशात होते.

सट्टेबाजार देखील गरम होता, जवळपास अधिकृत आणि अनधिकृत ६०० वेबसाईट आणि जवळपास ४०० मोबाईल अ‍ॅप्लिकेशन वर ऑनलाइन बेटिंग घेण्यात घेण्यात येत होती. ऑनलाइन बेटिंग(Cricket Bookie)  मुळे लहानमोठ्यासह वयोवृद्ध देखील ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप आणि वेबसाईटवर सट्टा लावत होते. भारतीय क्रिकेट संघ हा टॉपवर होता सर्वात अधिक सट्टा भारताच्या जिंकण्यावर लागला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम सामन्यावर सट्टेबाजारात ६० हजार कोटींची उलाढाल झाली होती. नाणेफेकी पासून प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धावावर सट्टा लावण्यात आला होता. एका सट्टेबाजाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सट्टा बाजारात भारताला पसंती होती. भारतावर ४५ ते ५० तर ऑस्ट्रेलियावर ५५ ते ६० पैसे दर मिळाला.
बुकींनी (Cricket Bookie) सांगितले की विश्वचषक विजेतेपदाच्या सामन्याच्या दिवशी सुमारे ५०० ते ६०० वेबसाइट आणि ३०० ते ४०० मोबाइल अ‍ॅप सक्रिय होते यावरून बुकींनी नाणेफेकीपासून ते एकूण धावसंख्या, आवडत्या फलंदाज किंवा गोलंदाजांवरही सट्टा लावण्यात आला होता. भारताच्या विजयावर सर्वाधिक सट्टा लावला गेला. पण, जेव्हा भारताचा डाव २४० धावांवर संपला, तेव्हा सट्टाबाजार ऑस्ट्रेलियाच्या विजयावर सट्टा लावत होता. सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत सट्टा सुरूच असल्याचे बुकीने सांगितले.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=8SpboLBEoA0

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.