Chhagan Bhujbal : ओबीसी बचाव सुरूच ठेवा

तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल पण तुम्ही ओबीसींच्या विचारांशी एकनिष्ठ राहून समाजासाठी काम करावे एवढेच माफक अपेक्षा मी ओबीसी नेत्यांकडून करू शकतो.

140
Abhishek Ghosalkar : “लोकांच्या डोक्याला झालंय तरी काय? मला कळत नाही
Abhishek Ghosalkar : “लोकांच्या डोक्याला झालंय तरी काय? मला कळत नाही" - छगन भुजबळ

तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल पण तुम्ही ओबीसींच्या विचारांशी एकनिष्ठ राहून समाजासाठी काम करावे एवढेच माफक अपेक्षा मी ओबीसी नेत्यांकडून करू शकतो. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या भुजबळांच्या विचारांपासून घेतलेल्या फारकती नंतर ते बोलत होते. (Chhagan Bhujbal)

भुजबळ माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ओबीसीच्या विविध राजकीय पक्षात काम करणाऱ्या नेत्यांना आवाहन करीत आपण कोणत्याही पक्षात असाल परंतु ओबीसीच्या विषयावरती ‘एक व्हा’ असे आवाहनच त्यांनी केले. एकटा तर एकटा पण लढा सुरूच राहणार आहे. ओबीसीचं काम करीत राहणार आहे. याला कितपत यश मिळेल ते माहीत नाही. या लढ्यात जे नवीन-जुने सोबत येतील त्यांना सोबत ओबीसींचा लढा कायम सुरू ठेवू, असेही भुजबळ यांनी सांगितले. (Chhagan Bhujbal)

(हेही वाचा – Woman’s Body Found In Suitcase : कुर्ला सुटकेस मर्डर केस- गुन्ह्याची उकल धारावीतून एकाला अटक )

राज्याचा मंत्री आणि एक नेता म्हणून आम्हाला पेटवापेटवी नको आहे. आमच्याकडून काही जाळलं गेलं नाही. सुरुवात ज्यांनी केली त्यांनी बोलावं त्यासोबतच भुजबळ यांनी आपण जरांगे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. पण संपर्क झाला नाही. माझ्या कोणत्या भूमिकेला जरांगेचं समर्थन नाही हे मला जाणून घ्यायचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. (Chhagan Bhujbal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.