Israel-Hamas Conflict: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा इस्रायलकडून निषेध, ‘लष्कर-ए-तोयबा’वर बंदी घालण्यासाठी निवेदन सादर

इस्रायलने बंदीबाबत आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले आहे.

140
Israel-Hamas Conflict: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा इस्रायलकडून निषेध, 'लष्कर-ए-तोयबा'वर बंदी घालण्यासाठी निवेदन सादर
Israel-Hamas Conflict: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा इस्रायलकडून निषेध, 'लष्कर-ए-तोयबा'वर बंदी घालण्यासाठी निवेदन सादर

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १५ वर्षे पूर्ण झाल्याचा निषेध करण्यासाठी इस्रायलने पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या संघटनेवर बंदी घातली आहे. यासंदर्भातील निवेदन सरकारकडे इस्रायलने सादर केले आहे. (Israel-Hamas Conflict)

भारत सरकारकडून ही बंदीची मागणी करण्यात आली नव्हती, मात्र इस्रायलने बंदीबाबत आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले आहे. यावेळी भारतातील चिंतेचे निराकरण या बंदीमुळे होईल, अशी आशा इस्रायलने व्यक्त केली आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्यात ज्यू केंद्राला लक्ष्य करण्यात आले होते. त्यात अनेक रहिवासी ठार झाले. अलीकडेच इस्रायलवर हल्ला करणाऱ्या हमासवर बंदी घालण्याची विनंतीही इस्रायलने भारताला केली आहे.

लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना आहे, जी शेकडो भारतीय नागरिकांच्या तसेच इतरांच्या हत्येसाठी जबाबदार आहे. या संस्थेने अत्यंत घृणास्पद कृत्ये केली असून ती आजही सुरू आहेत, असेही इस्रायलने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

(हेही वाचा – Woman’s Body Found In Suitcase : कुर्ला सुटकेस मर्डर केस- गुन्ह्याची उकल धारावीतून एकाला अटक )

इस्रायलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या १५व्या स्मृतीदिनाचे प्रतीक म्हणून इस्रायल राज्याने लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेवर बंदी घालावी. विशेष म्हणजे भारत सरकारने यासंदर्भात कोणतीही विनंती केली नसतानाही इस्रायलकडून औपचारिकपणे सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.

तसेच इस्त्रायलने या निवेदनात म्हटले आहे की, चांगल्या आणि शांततापूर्ण भविष्याच्या आशेने आम्ही मुंबई हल्ल्याला बळी पडलेल्यांसोबत एकजुटीने आहोत. इस्त्रायलकडून दहशतवादी संघटनांची यादीही जाहीर केली आहे. यामध्ये देशांतर्गत आणि देशाबाहेरील दहशतवादी संघटनांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.