Air Pollution : रस्ते धुण्यासाठी मुंबईत १ हजार टँकर भाड्याने घेणार

मुंबईतील वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी तसेच हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात असल्या तरी रस्ते आलटून पालटून दुण्यासाठी आता एक हजार टँकर भाडेतत्‍त्‍वावर घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

134
Air Pollution : रस्ते धुण्यासाठी मुंबईत १ हजार टँकर भाड्याने घेणार
Air Pollution : रस्ते धुण्यासाठी मुंबईत १ हजार टँकर भाड्याने घेणार

मुंबईतील वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी तसेच हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात असल्या तरी रस्ते आलटून पालटून दुण्यासाठी आता एक हजार टँकर भाडेतत्‍त्‍वावर घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या टँकर द्वारे संपूर्ण मुंबईतील रस्ते, पदपथ, चौक आदी आलटून पालटून एक दिवसाआड धुवावेत, जेणेकरून धुळीचे प्रमाण अत्यंत कमी होईल, असे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. (Air Pollution)

वातावरणीय बदलांमुळे मुंबईत मागील काही दिवसांपासून वाढलेले हवा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनांनुसार महानगरपालिकेमार्फत निरनिराळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. या उपाययोजनांची तसेच सार्वजनिक स्वच्छता कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी २१ नोव्‍हेंबर २०२३ भल्या पहाटेपासून पाहणी केली. (Air Pollution)

या पाहणीप्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे, डी विभाग सहायक आयुक्त शरद उघडे, एच पूर्व विभाग सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, एच पश्चिम विभाग सहायक आयुक्त विनायक विसपुते, के पूर्व विभाग सहायक आयुक्त मनीष वळंजू तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Air Pollution)

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, नागरी आरोग्याच्या दृष्टिने प्रदूषण ही मोठी समस्‍या आहे. वातावरणातील बदलांमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले असताना महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासनाला सूचना दिल्या होत्या की, संपूर्ण मुंबई महानगरामध्ये अधिकचे मनुष्‍यबळ व संयंत्रे नेमावित आणि धूळ नियंत्रणावर भर द्यावा. त्यानुसार, रस्ते, पदपथ व सार्वजनिक ठिकाणी साचलेली धूळ ब्रशने हटवून त्यानंतर पाण्याने धुवून स्वच्छता केली जात आहे. अपेक्षित अशी कामे होत असल्याचा आज मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. फॉगर, ऍन्टी स्मॉग व इतर संयंत्राचा उपयोग केला जात आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील धूलिकण कमी होत आहेत. (Air Pollution)

आता एक हजार टँकर भाडेतत्‍त्‍वावर घेवून संपूर्ण मुंबईतील रस्ते, पदपथ, चौक आदी आलटून पालटून एक दिवसाआड धुवावेत, त्यामुळे धुळीचे प्रमाण अत्यंत कमी होईल. तसेच, ज्‍या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, त्‍या सर्व ठिकाणी ग्रीन पडदा लावण्यात येत आहे. त्‍याचबरोबर फॉगर, स्प्रींकलर लावण्‍याचे आदेशही महानगरपालिकेने दिले आहेत. एकूणच, सर्व उपाययोजना आता अंमलात आल्या आहेत, त्याचे समाधान आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मुंबईतील सर्व विकासक व बांधकाम व्यावसायिकांनी देखील सर्व उपाययोजना करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. (Air Pollution)

(हेही वाचा – ‘हे’ आहेत वर्ल्ड कप विजेते कर्णधार)

सर्व पायाभूत प्रकल्पांना प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची सूचना…

मुंबई महानगरात पायाभूत विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. त्‍यात मेट्रो, बुलेट ट्रेन, एमटीएचएल यासह इतरही कामांचा समावेश आहे. ही कामे सुरु ठेवणे जितके आवश्यक आहे तितकेच प्रदूषण नियंत्रण देखील आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पायाभूत प्रकल्पांना देखील प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची सूचना महानगरपालिकेने केली आहे. फक्त पहाटे नाही तर दिवसभरामध्ये मुख्य व मोठ्या नाक्यांवर, मुख्‍य चौकांमध्‍ये फॉगर मशीन्‍स लावण्‍यास सांगितले आहे, जेणेकरून दोन-दोन तासांनी तुषार फवारणी करुन धूळ रोखता येईल. अशा रितीने धूलिकण कमी करण्यासाठी मुंबईत ४० ठिकाणी वॉटर फॉगर आणि ऍन्टी-स्मॉग गन लावण्यात आल्या आहेत. (Air Pollution)

आवश्यकता भासल्‍यास ‘क्लाऊड सीडींग’ देखील करण्‍याचे नियोजन आहे. मुख्य रस्त्यांबरोबरच छोटे रस्ते, गल्ल्या, वसाहती, समुद्र किनारे, नाले आदी ठिकाणी सुद्धा स्वच्छता ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, मुंबईतील कोळीवाडे, समुद्रकिनारे, वर्दळीची ठिकाणे स्‍वच्‍छ ठेवण्‍याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये दिवसातून चार ते पाच वेळा स्‍वच्‍छ करण्‍याबरोबरच निर्जंतुकीकरण करण्‍याची कामे सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. भविष्यातील कायमस्वरुपी उपाययोजनांचा भाग म्हणून मुंबईत वृक्षारोपण अधिक व्‍हावे. शहरी वनीकरणास चालना द्यावी. रस्ता दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करावे. जिथे-जिथे जागा आहे, तिथे हरितीकरण व हिरवळीचे आच्छादन वाढवावे, असे निर्देशही मुख्‍यमंत्री यावेळी दिले. (Air Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.