डिजिटल शिक्षण देणाऱ्या BYJU’s या कंपनीने फेमाच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ईडीने BYJUशी संबंधित कार्यालये आणि इतर परिसरांवर छापे टाकून झडती घेतली होती. कंपनीशी संबंधित अनेक कागदपत्रे आणि डिजिटल डेटाही जप्त करण्यात आला आहे. यानंतर, तपासादरम्यान ईडीला BYJUने परकीय चलन कायदा (फेमा) संबंधित अनेक तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. हा गैरव्यवहार सुमारे सुमारे ९,००० कोटी रुपयांचा आहे.
कंपनीचे ऑडिट झाले नाही
स्टार्टअप क्षेत्रातील कंपनी असल्याने, BYJUला परदेशातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला असल्याचे समोर आले आहे. छाप्यादरम्यान, २०११ ते २०२३ दरम्यान कंपनीला सुमारे २८,००० कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक मिळाली. या काळात कंपनीने थेट परदेशात गुंतवणुकीसाठी सुमारे ९,७५४ कोटी रुपये पाठवले. परदेशात पाठवलेल्या पैशांपैकी कंपनीने जाहिरात आणि मार्केटिंगच्या नावाखाली सुमारे ९४४ कोटी रुपये खर्च केले, ही माहिती समोर आली आहे. कंपनीचे पुस्तकांचे ऑडिट झालेले नाही. मागील आर्थिक वर्षाचे आर्थिक निकाल देखील मोठ्या विलंबाने जाहीर झाले. ईडीने कंपनीच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटवरून तपास सुरु केला आहे. ईडीने अनेक व्यक्तींच्या वैयक्तिक तक्रारींच्या आधारे BYJUच्या विरोधात तपास सुरू केला होता.
Join Our WhatsApp Community