Makeup Kit : ‘या’ १० टिप्स वापरून निवडा योग्य मेकअप किट

185
Makeup Kit : 'या' १० टिप्स वापरून निवडा योग्य मेकअप किट

तुम्हाला मेकअप (Makeup Kit) करायला आवडतो पण तुम्ही नवशिके आहात? मेकअप किट घेतांना गोंधळ उडतोय? अनेक मेकअप किट पैकी नेमकं कोणतं किट आपल्यासाठी योग्य आहे हे समजत नाही? पण आता काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्स वापरून तुम्ही योग्य मेकअप किट (Makeup Kit) निवडू शकता.

१. तुमच्या गरजा ओळखा –

मेकअप किटच्या (Makeup Kit) या अफाट जगात प्रवेश करतांना तुम्ही तुमच्या गरजा ओळखणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारचा मेकअप करायला आवडतो. तुमचं क्षेत्र कोणतं आहे, तसेच तुम्हाला रेग्युलर (दैनंदिन), नॅचरल लूक (नैसर्गिक), डॅशिंग (धाडसी) लूक अशा कुठल्या प्रकारचा मेकअप करायचा आहे हे ठरवणं फार महत्वाचं आहे.

२. संख्येपेक्षा गुणवत्ता महत्वाची :

काही मेकअप किट (Makeup Kit) वापरणे हे आकर्षक वाटत असले तरी, त्याची गुणवत्ता तपासणे फार महत्वाचे असते. त्यामुळे मेकअप किट निवडतांना नेहमी त्या किटची गुणवत्ता तपासून पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचा मेकअप हा लॉंग लास्टिंग हवा असेल तर तुमच्या मेकअप किटची गुणवत्ता चांगली असली पाहिजे.

(हेही वाचा – ‘हे’ आहेत वर्ल्ड कप विजेते कर्णधार)

३. त्वचेचा रंग आणि प्रकार :   

तुम्ही निवडलेला मेकअप किट (Makeup Kit) तुमच्या त्वचेच्या रंग आणि प्रकाराला पूरक आहे का याची खात्री करा. त्वचेच्या विशिष्ट रंगांनुसार तयार केलेल्या किटमध्ये अनेकदा नैसर्गिक सौंदर्य वाढवणाऱ्या छटा असतात. तुमची त्वचा संवेदनशील असल्यास जळजळ होण्याचा धोका कमी करण्यासाठी हायपोअलर्जेनिक उत्पादनांच्या आधारे तयार करण्यात आलेलं मेकअप किट निवडा.

४. परिपूर्ण किट :

नेहमी एक परिपूर्ण मेकअप किट (Makeup Kit) निवडणं हे फायद्याचं ठरू शकतं. टोन टोन्सचे मिश्रण असलेले रंग आपल्या किट मध्ये आहेत की नाही ते बघा. तसेच कोणत्याही प्रसंगासाठी आपण ते किट वापरू शकतो अशा किटची निवड करा.

५. प्रवासात उपयोगी

जर तुम्ही नेहमी प्रवास करत असाल तर प्रवासात आपल्याला घेऊन जायला सहज सोपं होईल असे किट (Makeup Kit) निवडा. ज्या गोष्टी टच-अपसाठी सोयीस्कर आहेत त्या गोष्टींचा किटमध्ये समावेश करा.

६. सामग्रीची यादी तपासा

तुमच्या मेकअप किटमधील (Makeup Kit) उत्पादने कशापासून बनवली आहेत हे तपासून घ्या. त्यामध्ये तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त असणारे उत्पादने आहेत का हे पाहून किट निवड.

(हेही वाचा – BYJU चा ९००० कोटींचा घोटाळा उघड; ‘फेमा’च्या तरतुदींचे उल्लंघन)

७. ऍलर्जी विरहित पदार्थ निवडा :

तुमच्या किटमधील (Makeup Kit) घटकांची यादी तपासा, विशेषतः जर तुम्हाला एखादी ऍलर्जी किंवा त्वचेचा त्रास असेल तर आपल्या सोयीनुसार प्रोडक्टची निवड करा.

८. साधने आणि अॅक्सेसरीज :

मेकअप किटमध्ये (Makeup Kit) आवश्यक साधने आणि अॅक्सेसरीज समाविष्ट आहेत की नाही याचे मूल्यांकन करा. दर्जेदार ब्रश आणि स्पंज आपल्या किटमध्ये आहेत का याची खात्री करून घ्या.

९. आपल्या बजेटचा विचार :

मेकअप किट (Makeup Kit) शोधण्यापूर्वी तुम्ही तुमच्या बजेटचा विचार करणं महत्वाचं आहे. आपल्या बजेटमध्ये आणि उत्तम गुणवत्तेचं किट शोधणं महत्वाचं आहे.

१०. उत्पादनाची कालबाह्यता तपासा :

मेकअप किटमधली (Makeup Kit) उत्पादने ही कालबाह्य (expiration dates) नाहीत ना हे तपासूनच किटची निवड करा. कालबाह्य झालेला मेकअप वापरल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.