एकेकाळी मुंबई ही हिरे व्यवसायाची नगरी म्हणून ओळखली जायची, पण आता मुंबईतील हिरे व्यापारी मुंबई सोडून सुरतला (Surat) जाऊ लागले आहेत, त्यामुळे सुरत आता डायमंड सिटी म्हणून ओळखली जाऊ लागले आहे. मुंबईतील २६ हिरे व्यापारी मुंबई सोडून सुरतला गेले आहेत.
सूरत डायमंड बोर्सच्या १३५ कार्यालयाचे उद्घाटन
सुविधांच्या अभावी याठिकाणाहून बहुतांश हिरे व्यापारी मुंबई महाराष्ट्रातून त्यांचा व्यवसाय करतात. परंतु आता मुंबईला मोठा फटका बसला आहे. कारण मुंबईच्या २६ हिरे व्यापाऱ्यांनी कायमचे त्यांचे ऑफिस सूरत (Surat)ला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. सूरत (Surat) डायमंड बोर्सच्या १३५ कार्यालयाचे आज औपचारिकरित्या उद्घाटन झाले. १३५ व्यापाऱ्यांपैकी २६ व्यापारी हे मुंबईचे कार्यालय बंद करून कायमचे सूरतला शिफ्ट झाले आहेत. दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर सूरत डायमंड बोर्सच्या ९८३ कार्यालये असलेली इमारत सर्वांसमोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पाचे अनावरण मोदींच्या हस्ते १७ डिसेंबरला होणार आहे. तत्पूर्वी याठिकाणी व्यापारांनी कार्यालयातून कामकाजाला सुरुवात केली. SBI ने २० नोव्हेंबरला डायमंड बोर्समध्ये एका शाखेचे उद्घाटन केले. जगभरातील हिरे व्यापारांची नजर सूरत (Surat) डायमंड बोर्सवर आहे. सूरत हे मॅन्यूफॅक्चरिंग हब आहे. आमची कंपनी ट्रेंडिंग आणि मॅन्यूफॅक्चरिंग करते. त्यामुळे हे मॅन्यूफॅक्चरिंग हब असल्याने ट्रेंडर्ससोबत थेट संवाद साधता येऊ शकतो. जागतिक बाजारपेठेसोबत आम्ही स्पर्धा करू शकतो म्हणून आम्ही सूरतला आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
(हेही वाचा NCERT आता शिकवणार रामायण-महाभारत; उच्चस्तरीय समितीचा प्रस्ताव)
Join Our WhatsApp Community