आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे. विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक आषाढीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. या परंपरेत अडथळा आणू नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (२१ नोव्हेंबर) मराठा समाजाला केले. (CM Eknath Shinde)
पंढरपुरात कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. या दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी यंदा कार्तिकी एकादशीची महापूजा कोण करणार याबाबत अजून स्पष्टता नसताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या महापूजेला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला कार्तिकी एकादशीच्या पूजेला विरोध न करण्याचे आवाहन केले आहे. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – Marathi Bhajan : प्रवास आनंददायी आणि निसर्गाचा आनंद घेत करायचाय, मग ‘ही’ १० मराठी भजने ऐकाच)
कार्तिकी एकादशीच्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. त्यामुळे या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठलनामाचाच गजर व्हायला हवा. सारा परिसर जयघोषाने दुमदुमुदे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community