सामान्यांचे जीवन चरित्र रेखाटणा-या इंग्रजी कादंबरीकार George Eliot

109
George Eliot यांचे खरे नाव मेरी एन एवान्स असे होते. जॉर्ज इलियटचा जन्म १८१९ मध्ये न्युनाटन, वॉर्विकशायर, इंग्लंड येथे झाला. त्यांचे वडील रॉबर्ट इव्हान्स बॅरोनेटचे इस्टेट मॅनेजर होते आणि आईचे नाव क्रिस्टियाना असे होते. एलियट एक इंग्रजी लेखक, पत्रकार आणि अनुवादक होत्या.
George Eliot या टोपणनावाने त्यांना ओळखली जाते. त्या व्हिक्टोरियन काळातील एक प्रमुख इंग्रजी लेखिका होत्या. महान इंग्रजी कादंबरीकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.
पुढे १८५१ मध्ये त्यांची नियुक्ती ‘वेस्टमिन्स्टर रिव्ह्यू’च्या सहाय्यक संपादकपदी झाली. एलियट यांच्या कादंबर्‍यामध्ये वास्तववाद आणि मूलभूत नैतिकता होती. एलियटने सामान्य लोकांच्या जीवनाचे चित्र रेखाटले. बोलीभाषेचा अचूक वापर केल्यामुळे त्यांच्या लेखनाचा प्रभाव अधिक जाणवू लागला.
त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी म्हणजे मिडलमार्च. या कादंबरीत इंग्रजी समाजाचे विस्तृत चित्रण केले आहे. प्रत्येक सामाजिक वर्गाच्या जीवनाचे तपशीलवार वर्णन यामध्ये आहे. एलियटने त्यांच्या १९७६ च्या डॅनियल डरोडो या कादंबरीत पुन्हा एकदा या विषयाला हात घातला. इलियटच्या कादंबर्‍यांवर अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिका देखील आल्या आहेत.
ऍडम बेडे, द मिल ऑन द फ्लॉस, रोमोला, मिडलमार्च ह्या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत. सीन्स ऑफ द क्लेरिकल लाइफ, ब्रदर जॅकोब, द लिफ्टेड वेल अशा कथासंग्रहांचे लेखन देखील त्यांनी केले आहे. त्यांनी अनेक कविता संग्रह देखील प्रकाशित केले आहेत. जॉर्ज एलियट यांनी पुरुषी वर्चस्वाला झुगारुन महिला लेखिका म्हणून स्वतःचे स्थान मोठे केले. आजही त्यांच्या लेखनाचे अनेक चाहते जगभर आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.